मुक्तपीठ टीम
तुम्हालाही मधुमेह आहे का? काय खावे आणि काय खाऊ नये? हे आरोग्यासाठी चांगले असेल का? मधुमेह टाळण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे? असे अनेक प्रश्न मनात येतात. ज्या मधुमेही रुग्णांना असे प्रश्न येतात त्यांच्यासाठी ही बातमी उपयुक्त आहे.
कार्बोहायड्रेट कमी तर, मधुमेहाचा धोका कमी…
- कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेतल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो.
- मधुमेहाच्या आजारात रक्तातील साखर वाढते आणि इन्सुलिन नीट काम करत नाही.
- अनुवांशिक आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे मधुमेहाची संख्या सातत्याने वाढत आहे.
- अमेरिकेतील Tulane विद्यापीठाच्या संशोधनानुसार, कमी कार्बोहायड्रेट आहारामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
- अमेरिकेत सुमारे ३७ दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत.
तज्ज्ञांच्या मते, कमी कार्बोहायड्रेट आहार, जर राखला गेला तर, टाईप २ मधुमेह टाळण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी एक उपयुक्त दृष्टीकोन असू शकतो. जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी सहभागींना दोन गटांमध्ये विभागून याचा अभ्यास केला.
अभ्यास एक, गट दोन आणि परिणाम अनेक…
- एका गटाला कमी कार्बोहायड्रेट आहार देण्यात आला.
- दुसऱ्या गटाला सामान्य आहार देण्यात आला.
- सहा महिन्यांनंतर, कमी-कार्बोहायड्रेट आहार गटातील हिमोग्लोबिन A1c मध्ये सामान्य आहार गटापेक्षा जास्त घट झाली.
- कमी कार्बोहायड्रेट आहार गटाचे वजन कमी झाले.