मुक्तपीठ टीम
ईपीएफओने कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली योजना आखली आहे. या योजनेचे नाव विमा एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड स्कीम असे आहे. यात प्रत्येक सदस्याला ७ लाखांचा विमा मिळणार आहे. प्रत्येक सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा काही भाग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या खात्यात जमा केला जाईल. चला जाणून घेवूया काय आहे ही योजना.
ईपीएफओच्या खात्यात जमा केलेली ही रक्कम भविष्यातील मोठी भांडवल असेल. कर्मचारी निवृत्त झाल्यावर पीएफ खात्यातील सर्व रक्कम कर्मचाऱ्यांना प्राप्त होते. ईपीएफओमध्ये कर्मचाऱ्यांना ७ लाख रुपयांचे विमा कवच मोफत मिळतो. हा विमा एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड स्कीम अंतर्गत उपलब्ध आहे. पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ७ लाख रुपयांची मदत मिळते.
काय आहे ईपीएफओची EDLI योजना?
- ईपीएफओची EDLI योजना लोकांना सुरक्षा देण्यास मदत करते.
- ही योजना ईपीएफ आणि ईपीएसच्या संयोजनाने काम करते.
- अनेक पीएफ खातेधारकांना या योजनेची माहिती नाही.
- माहिती नसल्याने त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही.
- या योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास नॉमिनीला गेल्या १२ महिन्यांचा पगार किंवा ७ लाख रुपयांची विम्याची रक्कम मिळते.
- पीएफ खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी
१) ८.३३ टक्के रक्कम ईपीएसमध्ये
२) ३.६७ टक्के ईपीएफमध्ये
३) ०,५ टक्के रक्कम ईडीएलआयमध्ये जमा केली जाते.
नॉमिनीला कसा होणार फायदे?
- ईपीएफओ सर्व खातेधारकांना खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव जोडण्यासाठी किंवा अपडेट करण्यास सूचित करते.
- खात्यात नॉमिनी असल्यास जर खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला काही समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
- नॉमिनीला ईपीएफ खात्यात जमा केलेले सर्व पैसे आणि विम्याचे पैसे सहज मिळणार.
- नामनिर्देशित व्यक्तीचे नाव खात्यात समाविष्ट नसेल तर खातेदाराचे सर्व कायदेशीर वारस स्वाक्षरी आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखवल्यानंतर त्या पैशावर दावा करता येईल.