मुक्तपीठ टीम
१९८० च्या दशकापासून भारतीय रस्त्यांवर दिसून येणारी लोकप्रिय बाईक यामाहाची आरएक्स १०० लवकरच बाजारात आपलं वर्चस्व गाजवणास पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. जुने ते सोने! अशी मराठी म्हणं आहे. तिचं म्हणं आता खरी होत आहे. भारतात अनेक दुचाकींनी आपला काळ गाजवला होता. १९८० च्या दशकापासून भारतीय रस्त्यांवर दिसून येणारी लोकप्रिय बाईक यामाहाची आरएक्स १०० लवकरच बाजारात आपलं वर्चस्व गाजवणास पुन्हा एकदा सज्ज आहे.
यामाहाची आरएक्स १०० ही एक लीजेंड बाइक आहे. लोकांना ही बाईक इतकी आवडली की आतापर्यंत तुम्हाला ही बाईक रायडर्ससोबत चांगल्या स्थितीत पाहायला मिळेल. या बाईकचे वैशिष्ट म्हणजे त्याची रचना आणि वजन. ही बाईक तिच्या इंजिन क्षमतेनुसार बरीच हलकी होती.
अलीकडेच,यामाहा लवकरच भारतात नवीन अवतारात आरएक्स १०० लॉंच करण्यासाठी सज्ज आहे. ही नवीन बाईक २०२६ पर्यंत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. पेट्रोल इंजिनऐवजी इलेक्ट्रिक मोटरसह ही बाईक येईल. देशात इलेक्ट्रिक बाईकची मागणी वाढत असल्याने, इलेक्ट्रिक मोटरसह यामाहाची आरएक्स १०० लाँच करणे हा कंपनीसाठी एक चांगला पर्याय मानला जात आहे. जर कंपनी ही बाईक पेट्रोल इंजिनसह सादर करणार असेल तर ती बीएस ७ नॉर्म्ससह लाँच करावी लागेल.