मुक्तपीठ टीम
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाक व्याप्त काश्मिरबाबत मोठं विधान केलं आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पोहोचल्यानंतरच जम्मू-काश्मीर आणि लडाखचा विकास होईल, असे त्यांनी म्हटले. शौर्य दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सिंह सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित केले. दरम्यान तो गिलगीट-बाल्टिस्तान भाग आहे तरी काय? जाणून घेऊया…
अतिशय सुंदर परिसर
- गिलगिट हा अतिशय सुंदर परिसर आहे. काराकोरमच्या छोट्या टेकड्यांनी वेढलेले आहे.
- येथे सिंधू नदी भारतातील लडाखमधून उगम पावते आणि बाल्टिस्तान आणि गिलगिटमधून वाहते.
- गिलगिट-बाल्टिस्तानमध्येच बाल्टोरो नावाची एक प्रसिद्ध हिमनदी आहे.
- काराकोरम प्रदेशात हिंदुकुश आणि तिरिच मीर नावाचे दोन उंच पर्वत देखील आहेत.
- गिलगिट व्हॅलीमध्ये सुंदर धबधबे, फुलांच्या सुंदर वेलीही आहेत.
या परिसराची भौगोलिक स्थिती काय आहे?
- याच्या पश्चिमेला खैबर-पख्तुनख्वा, उत्तरेला अफगाणिस्तानचा वाखान कॉरिडॉर, ईशान्येला चीनचा झिनजियांग प्रांत, दक्षिणेला पाकव्याप्त काश्मीर आणि आग्नेयेला भारताचे जम्मू आणि काश्मीर राज्य आहे.
- गिलगिट-बाल्टिस्तानचे एकूण क्षेत्रफळ ७२,९७१ वर्ग किमी आहे.
- अंदाजे लोकसंख्या सुमारे दहा लाख आहे.
- त्याचे प्रशासकीय केंद्र गिलगिट शहर आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे २.५ लाख आहे.
गिलगीट-बाल्टिस्तान भारताचाच भाग-
- १९४७ मध्ये झालेल्या फाळणीच्या आधारावर संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे.
- ‘गिलगिट-बाल्टिस्तान’ क्षेत्राचा समावेश याच राज्यात होतो.
- पाकिस्तानला हा परिसर रिकामा करावा लागेल.
पाकिस्तानचा कब्जा बेकायदेशीर आहे का?
- होय, पाकिस्तानचा गिलगिट-बाल्टिस्तानचा ताबा पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
- ब्रिटीश संसद आणि युरोपियन युनियनही त्याला काश्मीरचा भाग म्हणते.
- ब्रिटनच्या संसदेने काही काळापूर्वी पाकिस्तानचा गिलगिट-बाल्टिस्तानचा ताबा बेकायदेशीर असल्याचा ठराव मंजूर केला होता.
- गिलगिट-बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मीरचा अविभाज्य भाग असल्याचे ब्रिटिश संसदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे.
- तर पाकिस्तान या भागाला विवादित काश्मीरच्या क्षेत्रापासून वेगळे क्षेत्र मानतो.
- इतकेच नाही तर १९६३ मध्ये पाकिस्तानने या भागाचा एक छोटासा भाग चीनला दिला होता.
पाकिस्तानने कधीपासून कब्जा केला आहे?
- पाकिस्तानने १९४७ पासून गिलगिट-बाल्टिस्तानसह पीओकेवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.
- १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी हा प्रदेश जम्मू-काश्मीरप्रमाणे भारताचा किंवा पाकिस्तानचा भाग नव्हता.
- १९३५ मध्ये ब्रिटनने हा भाग गिलगिट एजन्सीला ६० वर्षांसाठी भाड्याने दिला, परंतु १ ऑगस्ट १९४७ रोजी हा भाग रद्द करण्यात आला आणि हा भाग जम्मू-काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांना परत करण्यात आला.
- महाराजा हरिसिंह यांनी आपले राज्य गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत वाढवले.
- हे सर्व क्षेत्र फक्त जम्मू-काश्मीर अंतर्गत येत होते.
२१ दिवसांनी पाकिस्तानने या भागात प्रवेश केला…
- ३१ ऑक्टोबर १९४७ रोजी, जेव्हा काश्मीरचे महाराजा हरि सिंह यांनी इंस्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेसेशनवर स्वाक्षरी केली तेव्हा हा भाग भारतात विलीन झाला, परंतु हरिसिंहच्या हालचालीनंतर, गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्थानिक कमांडर कर्नल मिर्झा हसन खान याने बंड केले.
त्यांनी २ नोव्हेंबर १९४७ रोजी गिलगिट-बाल्टिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. - ही स्थिती २१ दिवस कायम राहिली.
- २१ दिवसांनी पाकिस्तानने या भागात प्रवेश केला.
- या क्षेत्रावर कब्जा केला.
तेव्हा ब्रिटनच्या संसदेने सांगितले की, पाकिस्तानचा हा बेकायदेशीर कब्जा-
- एप्रिल १९४९ पर्यंत गिलगिट-बाल्टिस्तान हा पाकव्याप्त-काश्मीरचा एक भाग मानला जात होता, परंतु २८ एप्रिल १९४९ रोजी, पाकव्याप्त-काश्मीर सरकारसोबत एक करार झाला, ज्या अंतर्गत गिलगिटचे व्यवहार थेट पाकिस्तानच्या फेडरल सरकारकडे हस्तांतरित करण्यात आले.
- मात्र विरोध सुरू झाला.
- आंदोलक गिलगिट-बाल्टिस्तानचे लोक होते, ज्यांना पाकिस्तानचे नियंत्रण मान्य नव्हते.
- त्यानंतर २३ मार्च रोजी ब्रिटिश कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी ब्रिटिश संसदेत एक ठराव मांडला की, पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.
हे क्षेत्र त्यांचे नाही.
या ठरावात नेमके काय?
- पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोकांना त्यांचे मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून वंचित ठेवल्याचे या ठरावात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
- चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत तेथे कोणतेही बांधकाम विवादित क्षेत्रात हस्तक्षेप मानले जाईल, असे या ठरावात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
बाल्टिस्तानमध्येही चिनी प्रकल्प
- सप्टेंबर २००९ मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या करारानुसार चीन गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये एक मोठा ऊर्जा प्रकल्प उभारत आहे.
भारताने या प्रकल्पाला विरोध केला आहे.
पाकिस्तान उल्लंघन कसे करत आहे?
- पाकिस्तान या भागात चीनसोबत जे काही बांधकाम करत आहे, ते प्रत्यक्षात स्वायत्त क्षेत्रात आहे आणि ते नियमांचे उल्लंघन करून उभारले जात आहे.
- या भागात चीनचे २४ हजार सैनिक तैनात करणे हेही मोठे उल्लंघन आहे.
पाकिस्तान या भागात दडपशाही कशी करत आहे?
- जेव्हा-जेव्हा पाकिस्तान चीनच्या कारवायांचा येथील स्थानिक लोक विरोध करतात तेव्हा लष्कर त्यांना चिरडून टाकते.
- चीन-पाकिस्तान कॉरिडॉरला विरोध करणाऱ्यांवर दहशतवादविरोधी कायदे लादले जातात.
- पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर येथील स्थानिक लोकांवर दडपशाही सुरू ठेवली आहे.
पाचव्या प्रांताचा दर्जा देण्यासाठी पाकिस्तान का हतबल आहे?
- पाकिस्तानला चीनला खूश करायचे आहे.
- चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या भागातून जाणार आहे.
- हा वादग्रस्त भाग असल्याने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार होण्यापूर्वी त्याच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण व्हाव्यात अशी चीनची इच्छा आहे.
पाकिस्तानला हा भाग पूर्णपणे बळकवायचा आहे…
- हा पाकव्याप्त काश्मीरमधील स्वायत्त प्रदेश आहे.
- ते शुमाली क्षेत्र म्हणूनही ओळखले जात असे.
- पाकिस्तानला कसंही करून त्या भागाची स्वायत्तता संपवून तो भाग पूर्णपणे बळकवायचा आहे.
- म्हणूनच त्यांनी गिलगिट-बाल्टिस्तान ऑर्डर, २०१८ नावाचा नवीन कायदा आणला आहे, जेणेकरून या क्षेत्रावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल.
पाकिस्तानचा गिलगिट-बाल्टिस्तान ऑर्डर, २०१८ काय आहे?
- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी २१ मे रोजी या भागातील स्थानिक परिषदेचे अत्यावश्यक अधिकार रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.
- या अधिकारांसह परिषद स्थानिक बाबींवर निर्णय घेत असे.
- सरकारकडून हा निर्णय गिलगिट-बाल्टिस्तानला पाचवा प्रांत बनवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
- खुद्द पाकिस्तानच्या मानवाधिकार संघटनांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
- गिलगिट-बाल्टिस्तानबाबत पंतप्रधान अब्बासी यांनी दिलेल्या आदेशाविरोधात परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध आहे.
- पेशावर परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक जण जखमी झाले आहे.
- या निदर्शनात सर्व पक्षांचे लोक सहभागी झाले होते. ते घटनात्मक अधिकारांची मागणी करत होते.
हे क्षेत्र भारतासाठी महत्त्वाचे का आहे?
- हा भाग पाकव्याप्त काश्मीर (PoK) ला लागून आहे.
- भौगोलिक स्थितीमुळे हा परिसर भारतासाठी सामरिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.