मुक्तपीठ टीम
पालघर, ठाण्यासह कोकणातील ५ जिल्ह्यांमध्ये समाजसेवेच्या क्षेत्रात मोठं काम करणाऱ्या जिजाऊ संघटनेनं ग्रमापंचायत निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळे पालघर ठाण्यातील राजकारणात जिजाऊची साथ राजकारणात महत्वाची मानली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखालील जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरेंच्या नेतृत्वाखाली केल्या जात असलेल्या समाजसेवेला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं या निकालांमधून दिसल्याचं, स्थानिक जाणकारांचं म्हणणं आहे. तसेच पालघर जिल्ह्याचा आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजाऊ संघटनेला यश मिळत राहिलं तर भविष्यात राजकीय पक्षांना यशाचं समीकरण साकारण्यासाठी जिल्ह्यात जिजाऊची साथ घ्यावीच लागेल, असेही म्हटले जाते.
गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शिक्षण आणि आरोग्य कला संस्कृती क्रीडा यामध्ये प्राधान्याने जिजाऊ संघटना करीत असलेले काम आज याच कामाला ग्रामीण भागातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघरचा आधारवड जिजाऊ संघटनेला चांगलाच मतदाराने कौल दिला आहे. भविष्यात जिजाऊ अनेक राजकीय पक्षांची समीकरणे बदलू शकते. जिजाऊ करत असलेल्या कामाबाबत शिक्षणाने आरोग्य सेवेच्या कार्यात निष्ठेला महत्त्व मिळाले असून जिल्ह्यात जिजाऊचा आज ही निवडणुकीमध्ये नवखे उमेदवार असतानाही मतदाराने त्यांना निवडून दिले आहे तर जनता ही च्या सरपंच पदी केले आहे जिजाऊ’ चे ६९ डहाणू, वाडा नगर परिषदेत बदलणार समीकरणे पालघर : जिल्ह्यातील डहाणू शहराजवळील कांक्राडी आणि वाडा शहराजवळील कुडूस, मागाठणे इथल्या मतदारांनी नीलेश सांबरेंच्या जिजाऊ संस्थेच्या ३२ सरपंच आणि २६० सदस्य उमेदवारांना स्वीकारल्याने येत्या निवडणुकीत डहाणू आणि वाडा नगरपरिषदेमध्ये जिजाऊ संस्थेचा शिरकाव सत्ताधारी पक्षांना धोक्याची घंटा ठरू शकते. जिजाऊ या संस्थेला आता मतदार स्वीकारू लागल्याने जिल्ह्यात जिजाऊ संस्थेचे ६९ सरपंच आणि ५८३ सदस्य निवडून आल्याचा दावा नीलेश सांबरे यांनी केला आहे. जिजाऊ संघटनेच्या उमेदवारांनी अनेक राजकीय पक्षांना घाम गाळीत डहाणू आणि वाडा एमआयडीसीलगतच्या ग्रामपंचायतींच्या जागा जिंकल्या आहेत. यामुळे डहाणू नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा दिला आहे. वाडा तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींपैकी २० सरपंच आणि १७४ सदस्य जिजाऊने जिंकले असून डहाणू तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी कांक्राडी, चिंबावे, रायपूर, दिवशी आदी ग्रामपंचायतींमधून १२ सरपंच आणि ८६ सदस्य जिंकून आल्याचे निलेश सांबरे यांनी सांगितले. त्यामुळे वाडा आणि डहाणू नगर पंचायतीच्या आगाऊ निवडणुकीत ‘जिजाऊ’चे वाढलेले प्राबल्य प्रस्थापित पक्षासाठी धोक्याचा इशारा ठरणार आहे. डहाणू नगरपरिषदेवर असलेल्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांना धोक्याचा इशारा मानला जात आहे ? दुसरीकडे वाडा नगर पंचायतीवर शिवसेनेची (मूळ) सत्ता असून शिवसेनेत फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे झालेले दुर्लक्ष आणि शिंदे गटाच्या उमेदवारांना वाडावासीयांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने जिजाऊने २० सरपंच व १७४ सदस्य निवडून आणीत वाडा पंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी पावले टाकली आहेत.