मुक्तपीठ टीम
गुजरात निवडणुकीचं मैदान तापलं आहे. येत्या काही दिवसांत गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होतील. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आप-आपला प्रचार जोरदार करत आहेत. दरम्यान काँग्रेसने गुजरातमध्ये आपली रणनीती बदलली आहे. काँग्रेस या निवडणुकीत खेड्यापाड्यासून शहरांमधून थेट सामाजिक गटांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीवर केंद्रित आहे.
काँग्रेसने बदलली रणनीती…
- आक्रमक प्रचाराऐवजी, काँग्रेस खेड्यांपाड्यांपासून शहरांमध्ये थेट संवाद साधण्याच्या रणनीतीवर केंद्रित आहे.
- इतकंच नाही तर प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशी कोणतीही संधी दिली जाऊ नये, की ज्यामुळे निवडणुकीला आपल्या प्रतिमेभोवती केंद्रीत करण्याची संधी त्यांना मिळेल.
- काँग्रेसच्या निवडणूक प्रचारातील मवाळपणाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण म्हणजे भाजपा आणि आम आदमी पक्षाचा आक्रमक प्रचार.
ही निवडणूक अटीतटीची !!
- गुजरात निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस आमनेसामने असताना आता आम आदमी पक्षाने एन्ट्री मारली आहे.
- त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली.
- आपने गुजरातमध्ये आपली संपूर्ण ताकद लावलीय.
- मात्र प्रमुख विरोधी पक्ष असूनही काँग्रेसचा प्रचार या दोन्ही पक्षांच्या तुलनेत कुठेच नाही.
- मात्र त्यांचा पक्षही नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करताना दिसतोय.
विचारपूर्वक पावलं उचलतेय काँग्रेस!!
- गुजरात निवडणुकीशी संबंधित पक्षाच्या वरिष्ठ रणनीतीकारांच्या मते, केवळ आर्थिक साधनांची कमतरता हेच कारण नाही, तर गेल्या पाच-सहा निवडणुकांमध्ये गुजराती अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा सर्वांवर वरचढ असल्याचेही दिसून आले आहे.
- काँग्रेसच्या रणनीतीकारांच्या मते, आक्रमक निवडणूक प्रचारात नेहमीच एक मुद्दा किंवा विधान निवडणुकीचा मार्ग बदलण्याचा धोका असतो.
- २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जसे गुजरातमध्ये काँग्रेस भाजपाचा पाडाव करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत असताना, पक्षाचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानाने उलटसुलट चर्चा घडवून आणली.