मुक्तपीठ टीम
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपाने शुक्रवारी पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, स्मृती इराणी, ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहेच. पण संसदीय समितीतून नाव वगळले गेल्यामुळे काहीसे बाजूला पडलेत असे वाटणारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचाही स्टार प्रचारकांमध्ये आहेत.
प्रचारासाठी भाजपानेही प्लान तयार केला !!
- हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाने प्रचाराला सुरुवात केली आहे.
- प्रचारासाठी भाजपानेही प्लान तयार केला आहे.
- भाजपाने प्रचारासाठी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसह प्रवक्तेही मैदानात उतरवले आहेत.
- त्याशिवाय पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
- भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा
- केंद्रीय मंत्री अमित शाह
- राजनाथ सिंह
- स्मृती इराणी
- ज्योतिरादित्य सिंधिया
- मनोज तिवारी
- संबित पात्रा
- दुष्यंत कुमार गौतम
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
- मुख्यमंत्री जयराम ठाकूर
- बीएल संतोष
- भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप
- माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाळ
- माजी मुख्यमंत्री शांता कुमार
- भाजपाचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव
- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
- बीके सिंग
- हरदीप पुरी
- शिवराज सिंह चौहान
- मनोहर लाल खट्टर
- पुष्कर सिंग धामी
- सौदान सिंग
- अविनाश राय खन्ना
- मंगल पांडे
- तेजस्वी सूर्या
- विनीत श्रीनिवासन
- देवेंद्र सिंग राणा
- संजय टंडन
- किशन कपूर
- इंदू गोस्वामी
- सिकंदर कुमार
- पवन राणा
- महेंद्रसिंग ठाकूर
- राजीव बिंदल
- रश्मीधर सूद
- हर्ष महाजन
- पवन काजल
- सरदार संदीप सिंह