मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही राज्यात या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. अश्यातच आता देशांतर्गत एलपीजी किंमत प्रति सिलिंडर २५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या चार दिवसांत घरगुती गॅसच्या किंमती दुसऱ्यांदा वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडल असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
या प्रमुख शहरातील सिलिंडरचे दर
आज घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमत २५ रुपयांनी वाढ झाल्याने दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रति सिलिंडरच्या किंमती ८१९ रुपयांवर पोहचल्या आहेत. तर कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत ८४५.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८३५ रुपयांवर पोहचली आहे.
सातत्याने वाढत आहेत दर
- डिसेंबर ते १ मार्च या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती २२५ रुपयांनी वाढल्या आहेत.
- डिसेंबरमध्ये गॅसची किंमत ५९४ रुपये होती, ती आता वाढून ८१९ रुपये झाली आहे.
- पहिल्यांदा पन्नास रुपयांची वाढ झाली, त्यानंतर पुन्हा एकदा ५० रुपयांची वाढ करण्यात आली. २५ फेब्रुवारीला गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली.
- त्यानंतर आज पुन्हा १ मार्च रोजी २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
असे तपासा घरगुती गॅसचा दर
- घरगुती गॅसच्या किंमती सतत वाढत आहे, अशा परिस्थितीत प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की आज पुन्हा गॅसची किंमत वाढली आहे का.
- त्यामुळे गॅसच्या किंमती जाणून घेऊ इच्छित असल्यास आपण ऑनलाइन तपासू शकता.
- यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या वेबसाइटवर जावे लागेल.
- कंपन्या दरमहा नवीन दर जारी करत असतात.
मुंबईतील गॅस सिलिंडरच्या किंमती
- मुंबईत १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरच्या खरेदीसाठी ग्राहकांना आता ८१९ मोजावे लागतात.
- सध्या १४.२ किलोचा (अनुदानीत) गॅस सिलिंडरची किंमत ७९४ रुपये आहे.
- त्यात आजपासून २५ रुपयांची वाढ होणार आहे.
- एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा दर ७८९.५० रुपयांवर पोहोचला होता.
- मात्र सरकारने त्यानंतर सिलिंडरवर जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती.
- मात्र डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.