मुक्तपीठ टीम
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीत पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे यांचा विजय झाला आहे. माजी कसोटीवीर संदीप पाटील पराभूत झाले आहेत. यावेळी अमोल काळे यांना १८३ तर संदीप पाटील यांना १५८ मतं मिळाली आहेत. शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असे मोठे राजकारणी विरोधात असाताना देखील क्रिकेटर संदीप पाटील यांचा फक्त २५ मतांनी पराभव झाला आहे.
एमसीएच्या निवडणुकीत अमोल काळे यांचा विजय !!
- या निवडणुकीत राजकीय विरोधक असलेले भाजपाचे नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र आले होते.
- गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण ३८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
- या निवडणुकीत पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार अमोल काळे यांचा विजय झाला आहे.
- अमोल काळे निवडून आल्यानंतर त्यांनी सर्व पॅनेलचे आभार मानले.
- तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी काळे निवडून आल्यानंतर त्याठिकाणी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
संदीप पाटील फक्त २५ मतांनी रोखले गेले!
- सुरुवातीला शरद पवार यांच्या पॅनलने अध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांना पाठिंबा दिला होता.
- मात्र, आशिष शेलार यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी निर्णय बदलला.
- शरद पवार आणि आशिष शेलार पॅनल एकत्र आले.
- आशिष शेलार बीसीसीआय खजिनदार झाल्याने त्यांच्याजागी अमोल काळे यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती.
- या निवडणुकीत अमोल काळे यांना १८३ मतं मिळाली तर संदीप पाटलांना एकूण १५८ मतं मिळाली. म्हणजेच संदीप पाटलांचा २५ मतांनी पराभव झाला.
कोणाला किती मतं?
- अमोल काळे- १८३ मतं
- संदीप पाटील- १५८ मतं
- अजिंक्य नाईक- २८६ मतं
- मयांक खांडवाला- ३५ मतं
- नील सावंत- २० मतं
- अरमान मलिक- १६२ मतं
- जगदीश आचरेकर- १६१ मतं
- गणेश अय्यर- २१४ मतं
- मलिक मर्चंट-१२३ मतं