मुक्तपीठ टीम
प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या द्वारे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात (पुणे, नाशिक आणि कोकण विभाग कार्यक्षेत्रात) नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात करण्याता आली. या उपक्रमांचा उद्देश, ज्येष्ठ नागरिक निवृत्तीवेतनधारकांना वास्तविक वेळेत (रिअल टाइम) व्यावहारिक सहकार्य देण्यासाठी सध्या, दररोजच्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यांचा उपयोग करुन प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या हितसंबंधितांच्या सहभागाला आणि सार्वजनिक सेवा वितरणाच्या प्रसाराला बळकटी देणे हा आहे
प्रधान महालेखापाल (A & E)- १ कार्यालयामार्फत राज्य निवृत्ती वेतनधारक, जीपीएफ सदस्य आणि राज्य सरकारच्या विभागातील आहरण आणि संवितरण अधिकारी यांच्यासाठी तंत्रज्ञानाशी मानवी सांगड घालून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत.
पेन्शन/ GPF संवाद
प्रधान महालेखापालांनी सुरू केलेल्या ‘पेन्शन तुमच्या दारी’ उपक्रमाचा हा अविभाज्य भाग आहे. हे राज्य निवृत्तीवेतनधारकांसाठी ऑनलाइन पेन्शन संवादाच्या स्वरुपात आहे. जे त्यांना त्यांच्या समस्या/तक्रारी/चिंतेंवर, मोबाइल व्हॉईस कॉल, व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यास मदत करते. पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन प्रकरणाची स्थिती जाणून घेण्यासाठी किंवा इतर अन्य मदतीसाठी विविध कार्यालयांमध्ये जाण्याची गरज नाही. ते त्यांच्या निवृत्ती वेतनाशी संबंधित समस्यांबद्दल प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या टीमशी घरुनही चर्चा करू शकतात. पेन्शनधारक/जीपीएफ सदस्यासोबत संवाद, दर शुक्रवारी आयोजित केला जातो. हा विशेषतः वृद्ध आणि आजारी निवृत्तीवेतनधारकांसाठी एक उपयुक्त पर्याय आहे. त्यांच्या निवडीच्या किंवा सोयीच्या वेळी पेन्शन संवादासाठी नोंदणी तीन पद्धतीद्वारे केली जाऊ शकते.
- एजी ऑफिसच्या संकेतस्थळावर उपलब्ध पेन्शन संवाद’ टॅबवरील “नोंदणी लिंकद्वारे https://cag.gov.in/ae/mumbai/en नोंदणी करु शकतात.
- व्हॉइस-मेल सेवा, ज्याद्वारे पेन्शनधारक/जीपीएफ सदस्य, व्हॉइस मेल नंबर- 020-711777775 वर कॉल केल्यानंतर त्यांची विनंती रेकॉर्ड करून पेन्शन संवादासाठी 24/7 नोंदणी करू शकतात.
- टोल-फ्री सेवा फोन नंबर 1800-22-0014 ज्याद्वारे प्रधान महालेखापाल कार्यालयाशी विनामूल्य संपर्क साधला जाऊ शकतो.
ऑनलाइन पेन्शन/ GPF सेवा पत्र
ही एक ऑनलाइन ड्रॉप बॉक्स सुविधा आहे, जी एप्रिल २०२१ मध्ये सुरू करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश निवृत्तीवेतनधारकांना प्रधान महालेखापाल कार्यालयाशी संपर्कात राहण्यास आणि ऑनलाइन सबमिशनद्वारे त्यांची विनंती आणि समस्या सोडवण्यासाठी मदत करणे आहे. पेन्शनधारकांनी ऑनलाइन ड्रॉप बॉक्सद्वारे मांडलेल्या तक्रारी/प्रश्नांना PAG कार्यालयाच्या टीमकडून टेलिफोन कॉल्स आणि ईमेलद्वारे प्रतिसाद दिला जातो. ऑनलाइन पेन्शन सेवा पत्र नोंदणी लिंक https://cag.gov.in/ae/mumbai/en/page-se-mumbai pension-sewa-patra द्वारे ऍक्सेस केली जाते. ऑनलाइन GPF सेवा पत्र नोंदणी लिंकवर URL द्वारे प्रवेश केला जातो.
ऑनलाइन हेल्प डेस्क
हा पेन्शनधारक आणि GPF सदस्यांना त्यांच्या समस्या आणि समस्यांचे जलद निराकरण करण्यात मदत करण्यासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. हेल्प डेस्क, राज्य सरकारचे अधिकारी, जसे की, कोषागार अधिकारी आणि आहरण आणि संवितरण अधिकारी यांना त्यांच्या प्रक्रिया संबंधित प्रश्नांना, लेखापाल कार्यालयात ‘helpdesk.mh1.ae@cag.gov.in द्वारे, एक सोपा पर्याय प्रदान करतो.
नॉलेज चॅनेल
निवृत्तीवेतनधारक, GPF सदस्य आणि राज्य सरकारचे आहरण आणि संवितरण अधिकारी आणि कोषागार आणि लेखा अधिकाऱ्यांना तांत्रिक बाबींची माहिती देण्यासाठी कार्यालयाने सुरु केलेला एक सक्रिय प्रयत्न आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. नॉलेज चॅनेल लेखा व अनुज्ञेयता संबंधित संक्षिप्त तांत्रिक व्हिडिओ मॉड्यूल कॅप्सूल होस्ट केले जातात. जेणेकरुन नियम आणि प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि परिचित होण्यास मदत होईल.
एजी ऑफिसने तयार केलेल्या तांत्रिक व्हिडिओ मॉड्यूल्समध्ये उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे (मराठी आणि इंग्रजीमध्ये), AC/DC बिले (मराठीत), (iii) पेन्शन प्रस्ताव सादर करणे (मराठीत), पेन्शन संवाद (मराठी आणि इंग्रजीमध्ये), सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम (मराठी आणि इंग्रजीमध्ये), पेन्शन पीएफ सेवा पत्रावर स्किट (मराठीत) हे विषय (इंग्रजी/मराठीत) समाविष्ट आहेत.
https://cag.gov.in/ae/mumbai/en/video-gallery या URL चॅनेलवर नवीन ज्ञानाचे व्हिडिओ बघू शकता. तसेच हे व्हिडीओ प्रधान महालेखापाल (लेखा आणिअनुज्ञेयता)-1 कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अपलोड केले जातात.