Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! पुरेसं झोपा!! पाच तासांपेक्षा कमी झोपाल, तर आजारी जास्त पडाल…

October 20, 2022
in featured, आरोग्य
0
sleep

मुक्तपीठ टीम

एखाद्यावेळेस अपुरी झोप झाल्यास दुसऱ्या दिवशी आपल्या वागण्यावर, आपल्या कामावर त्याचा परिणाम दिसून येतो. तुम्ही रात्री उशीरापर्यंत मोबाईल हातात घेऊन जागता का? उद्या सुटीच आहे, म्हणून उशीरा झोपता? असे असेल तर तुम्ही तुमच्या झोप आणि दिनक्रमाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. जे ५० वर्षांच्या वयात पाच तास किंवा त्याहून कमी झोपतात त्यांना गंभीर आजारांचा धोका २० टक्के जास्त असतो.

जसं अन्न, वस्त्र, निवारा, पाणी हे जीवनावश्यक आहे त्याचप्रमाणे झोपही जीवनावश्यक आहे. पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोप झालेल्या लोकांमध्ये दोन गंभीर आजार होण्याचा धोका ४० टक्के असतो. यामध्ये हृदय आणि किडनी इत्यादी आजारांचा समावेश आहे. झोपेमध्ये आपल्या शरीरात महत्त्वाचे जैविक बदल होत असतात. यावरुन झोपेतील बिघाड आपल्या आयुष्यावर किती परिणाम होऊ शकतो याचा अंदाज येईल.

कमी झोपेमुळे शरीरावर होणारे परिणाम

  • ५ तासांपेक्षा कमी झोप झाल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
  • मेंदू शकलेला राहतो आणि थकव्याचे प्रमाण वाढते.
  • अचानक चक्कर येते, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
  • शरीरात इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
  • वजन वाढण्याचा धोका वाढतो.

५०, ६० आणि ७० वर्ष वयोगटातील लोकांनी पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोपल्याने दोन किंवा अधिक गंभीर आजारांचा धोका वाढतो. लोकांनी दररोज सात ते आठ तास झोप घ्यावी असा सल्ला डॉक्टरही देतात.


Tags: healthMuktapeethphysical illnesssleepआरोग्यझोपमुक्तपीठशारिरीक आजार
Previous Post

थरूर निवडणुकीत पराभूत, पण पवार, पायलटांपेक्षा मिळवली जास्त मतं!

Next Post

बिग बॉसमधील साजिद खान आणि पुन्हा चर्चेत आलेलं Me Tooचं वादळ…

Next Post
Sajid Khan

बिग बॉसमधील साजिद खान आणि पुन्हा चर्चेत आलेलं Me Tooचं वादळ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!