रोहिणी ठोंबरे
यूपीएससी क्रॅक करणाऱ्यांच्या संघर्षाचे किस्से आपण ऐकत असतो. कौटुंबिक गरिबी, कठीण परिस्थितीवर मात करून ते यश मिळवतात हे जाणून घेतल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते. असाच एक आयपीएस अधिकारी म्हणजे शिवदीप वामनराव लांडे, ज्यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्पा पाहिला. आयपीएस शिवदीप वामनराव लांडे हे सध्या बिहारच्या कोसी रेंजचे नवीन डीआयजी आहेत. मध्यंतरी त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रात झाली, जिथे त्यांनी ड्रग माफियांना चांगलाच धडा शिकवला.
शिवदीप वामनराव लांडेंना, कडक आयपीएस, सिंघम, सुपरकॉप, गुन्ह्यांचा शत्रू या आणि अशा अनेक नावांनी ओळखले जाते. नुकतेच आयपीएस लांडे यांच्या ‘वुमन बिहाइंड द लायन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी लांडे म्हणाले की, “या पुस्तकात एका मुलाचा उल्लेख आहे, ज्याला लहानपणी वडिलांना मारून घरातून पळून जावे, असे वाटायचे. आज तो आयपीएस अधिकारी आहे.” यामुळे सर्वांना यामागचे कारण काय आहे हे जाणून घ्यायची आतुरता आहे.
कडक रूबाबामागे हळव्या मनाचा दडलेला लेखक!
- आयपीएसच्या कठोर चेहऱ्यामागे एक हळव्या मनाचा लेखकही दडलेला आहे.
- एकेकाळी पत्नी ममता साठी वन टू वन लिहिणार्या लेखकाने मुलगी आराहासाठी कविता लिहिल्या.
- आता शिवदीप लांडे यांनी संपूर्ण पुस्तक लिहिलं आहे… वुमन बिहाइंड द लायन.
- या पुस्तकात स्वत: लांडे यांनी कबूल केले आहे की, त्यांना एकदा वडिलांचा खून करायचा होता.
एकेकाळी शिवदीप लांडेंना वडिलांचा खून करायचा होता…
- शिवदीप वामनराव लांडे यांनी स्वतःच्या आयुष्याशी संबंधित हा मोठा खुलासा केला आहे.
- पटना येथे वूमन बिहाइंड द लायन या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी लांडे यांनी ही माहिती दिली.
- माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांनी वडिलांना मारण्याचा विचारही केला होता. असे ते म्हणाले.
- शिवदीप लांडे त्यांचे पूर्ण नाव शिवदीप वामनराव लांडे असे लिहितात.
- त्यांच्या म्हणण्यानुसार लहानपणी त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती. घरच्यांची अशी अवस्था बघून त्यांना अनेकदा राग यायचा.
- त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते पण ते अंमली पदार्थांच्या आहारी गेले होते. त्यांना पाहून लांडे यांना राग यायचा. याच कारणामुळे घरची आर्थिक परिस्थितीही बिकट होती, जी वडिलांची नोकरी गेल्यानंतर बिघडली.
- अशा परिस्थितीत लांडे यांच्या आईने मुलांसह संपूर्ण घर त्यांनी सांभाळले. आईकडून प्रेरणा घेऊन शिवदीप लांडे यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
- परंतु ते आयपीएस झाले आणि हे पुस्तक त्यांनी त्यांच्या आईला अर्पण केले आहे.
आईने केलेल्या संघर्षावर पुस्तक अर्पण!
- पुस्तकात त्यांनी आईचे समर्पण आणि संघर्षही नमूद केला आहे.
- आयपीएस अधिकारी लांडे यांनी सांगितले की, मी गरिबीत वाढलो आणि कठोर संघर्षांवर मात करून या पदावर पोहोचलो.
- यासाठी त्यांच्या आईने अथक परिश्रम घेतले आहेत.