मुक्तपीठ टीम
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्वरीत त्यांना रुगणालयात दाखल करण्यात आले. औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारण होत नसल्याने संभाजीनगरमधून उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. शिरसाट एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना झाले.
दोन दिवसांपासून शिरसाट यांच्या प्रकृतीत बिघाड
- गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती.
- सोमवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
- त्यांचा रक्तदाब वाढला होता.
- त्यांना छातीमध्ये दुखत होतं तसेच अस्वस्थही वाटत होतं.
- त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
- त्यांना बीपी कमी करण्यात आला.
- सकाळी आठ ते सव्वा आठदरम्यान शिरसाट यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आलं.
- एका खासगी कार्डियाक रुग्णावाहिकेत त्यांना शिफ्ट केलं.
- पावणे नऊच्या सुमारास त्यांना लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
संजय शिरसाट एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुंबई विमानतळावरील रुग्णवाहिकेतून कार्डियाक एब्युलन्समध्ये संजय शिरसाट स्वतः चालत गेले. कार्यकर्त्यांच्या हात धरुन संजय शिरसाट हे स्वतः कार्डियाक रुग्णावाहिकेमध्ये चढले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत होता.
संजय शिरसाट यांच्या भेटीला एकनाथ शिंदे होणार हजर!
- सध्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
- त्यांच्यावर एन्जीओग्राफी करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.