मुक्तपीठ टीम
आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. अशी अनेक कामे आहेत जी आधार कार्डाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपले आधार कार्ड व्यवस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र काही वेळा निष्काळजीपणामुळे आधार कार्डही हरवले जाते आणि आधार क्रमांक लक्षात नसेल तर मोठी अडचण होते. अशा परिस्थितीत लोकांकडे ई-आधार कार्ड डाउनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
आधारकार्ड हरवलं, नंबर लक्षात नाही?… टेंशन नाही, ‘हे’ करा
- आधार क्रमांकाशिवाय ई-आधार डाउनलोड करा.
- जर काही कारणास्तव तुमचे आधार कार्ड हरवले आणि १२ अंकी आधार क्रमांक तसेच २८ अंकी एनरोलमेंट आयडी आठवत नसेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही.
- या दोन क्रमांकांशिवायही तुम्ही ई-आधार सहज डाउनलोड करू शकता.
- ई-आधार डाउनलोड करण्यासाठी, Enrolment ID Retrieve करावे लागेल.
Enrolment ID कसा मिळवावा?
- सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- यानंतर मोबाईल फोनवर Get Aadhaar हा पर्याय निवडा.
- Enrolment ID Retrieve पर्यायावर क्लिक करा.
- सर्व तपशील भरल्यानंतर send OTP पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एनरोलमेंट आयडी किंवा आधार क्रमांक मिळेल.
ई-आधार डाउनलोड करण्यासाठी सोप्या स्टेप्स
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- Download Aadhaar Option वर क्लिक करा.
- यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा एनरोलमेंट आयडी टाका.
- तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
- त्यानंतर OTP टाका.
- तुमचे ई-आधार डाउनलोड केले जाईल. त्याची प्रिंट काढा.