मुक्तपीठ टीम
देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणूका या होतचं असतात. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकाला मतदान ओळखपत्र आवश्यक असते. १८ वर्षे पूर्ण झालेले भारतातील सर्व नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. ज्या लोकांनी अद्याप मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली नाही ते सर्व लोक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. चला तर जाणून घेऊया मतदान ओळखपत्रासाठी कसा करावा अर्ज.
निवडणूक आयोगाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- पूर्वी जिथे मतदार ओळखपत्रासाठी अर्ज फक्त स्थानिक किंवा राष्ट्रीय निवडणुकांपूर्वीच करता येत होता, तिथे आता भारतीय निवडणूक आयोगाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
- यामुळे मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता.
मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- मतदार सेवा पोर्टल येथे क्लिक करा
- येथे तुम्हाला एक नवीन खाते तयार करावे लागेल, ज्यासाठी मोबाइल नंबर वापरा.
- आता मोबाईल नंबरवर एक OTP येईल, जो स्क्रीनवर दिलेल्या बॉक्समध्ये टाकावा लागेल.
- आता पासवर्ड निवडण्याचा पर्याय मिळेल, त्यानंतर खाते तयार होईल.
- या वेबसाइटवर लॉग इन करताच नवीन मतदार नोंदणीचा पर्याय दिसेल.
- येथे सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर ‘सबमिट’ वर क्लिक करा
- सबमिशन केल्यानंतर, ईमेल आयडीवर वैयक्तिक मतदार आयडी पृष्ठाच्या लिंकसह ईमेल पाठविला जाईल
- या पृष्ठाद्वारे आपण अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकतो.
- मतदार ओळखपत्र साधारणपणे अर्ज केल्याच्या एका आठवड्यापासून एक महिन्याच्या आत उपलब्ध होते.