मुक्तपीठ टीम
निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखांची घोषणा करताच ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची चर्चा सुरू होते. निवडणुकींद्वारे अनेक उमेदवारांचे भवितव्य जनता ईव्हीएमच्या माध्यमातून ठरवते. सात चरणांत होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदार ईव्हीएमद्वारे हजारो उमेदवारांच्या भविष्याचा निर्णय घेतात. नुकत्याच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. गुजरातमध्येही निवडणुका होणार आहेत, ज्यांच्या तारखा निवडणूक आयोग दिवाळीनंतर जाहीर करू शकते.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजे काय?
- ‘ईव्हीएम’ अर्थातच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन.
- या मशीनमध्ये दोन प्रकारचे युनिट्स आहेत. यात कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट असते.
- मतदार मतदानासाठी जातात तेव्हा मतदान केंद्रावर उपस्थित असलेले निवडणूक अधिकारी कंट्रोल युनिटद्वारे बॅलेट युनिट चालू करतात. त्यानंतरच मत घेतले जाते.
- या युनिटमध्ये उमेदवारांची नावे लिहिली जातात, त्यापैकी मतदार आपल्या आवडत्या उमेदवाराची निवड करतो.
- ‘ईव्हीएम’चे मुख्यत्वे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन (VVPAT) असे तीन भाग असतात.
- मतदान अधिक पारदर्शी करण्यासाठी २०१० नंतर ‘व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन’चा वापर करण्यास सुरूवात झाली आहे.
ईव्हीएम मशीन कोणी बनवली?
- भारतात ईव्हीएम बनवण्याचे श्रेय सरकारी मालकीच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांना जाते.
- या दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन विकसित आणि चाचणी केली. त्यानंतर त्याचा वापर निवडणुकीत होऊ लागला.
- आजही या कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि इतर संबंधित उपकरणे तयार केली जातात.
- ईव्हीएमचा वापर मतदान आणि मतमोजणीसाठी केला जातो.
- केरळच्या उत्तर परावूर विधानसभा मतदारसंघात १९८९ मध्ये भारतात पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला.
ईव्हीएममध्ये डेटा किती दिवस साठवला जातो?
- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बॅटरीवर काम करते. त्यामुळे लाईट गेल्यावरही मतदानाची प्रक्रिया सुरू असते.
- यासोबतच या मशीनबाबत हेही आश्वासन देण्यात आले आहे की, त्याचे निळे बटण दाबताना किंवा ईव्हीएम चालवताना कोणालाही विजेचा शॉक लागण्याचा धोका नाही.
- ईव्हीएममध्ये, डेटा क्लिअर होईपर्यंत कंट्रोल युनिट त्याच्या मेमरीमध्ये निकाल सेव्ह करू शकते.
- ईव्हीएममध्ये बॅटरी असते. त्यामुळे वीज नसल्यास मतदान प्रक्रिया खंडित होत नाही. ईव्हीएममुळे कधीही शॉक बसण्याचा धोका नाही. ईव्हीएम मशीनची रचना सर्व बाबींचा विचार करुन केलेली असते.