Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वाचनाच्या माध्यमातून माणूस संस्कारक्षम बनविण्याचे काम

October 15, 2022
in घडलं-बिघडलं
0
Reading Inspiration Day

मुक्तपीठ टीम

माणूस घडविण्याचे आणि संस्कारक्षम बनविण्याचे काम वाचनाने होते. त्यामुळे वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून ही वाचनाची सवय जोपासण्याचे काम होईल, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील मराठी भाषा समिती यांच्या विद्यमाने “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमाचे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते झाले. विधिमंडळ सचिवालयाचे सहसचिव अनिल महाजन, प्रसिद्ध कवयित्री व लेखिका नीरजा, उपसचिव आठवले आदींची यावेळी उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते.

Reading Inspiration Day

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या देशाला विकसित देश बनवण्याचा प्रयत्न केला. आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता आहोत. अर्थात आपण शिक्षित झालो नाही तर विकसित देश बनवण्याच स्वप्न पूर्ण करू शकत नाही. त्यामुळेच वाचनसंस्कृती आणि या दिनाचे महत्व आहे. पूर्वीच्या काळी वाचन अधिक प्रमाणात होते. आता दूरदर्शन, इंटरनेट आदी माध्यमामुळे ते कमी झाल्याचे दिसते आहे.  पाहिजे ती माहिती आता सहजगत्या या माध्यमावर उपलब्ध होत असल्यामुळे वाचनाची सवय कमी झाली असली तरी ती सवय जोपासणे आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कवयित्री नीरजा यांनी, ‘सांस्कृतिक उभारणी आणि वाचन संस्कृती ‘ या विषयावर विचार मांडले. ग्रामीण भागात आजही वाचनाची भूक आहे. तेथील तरुण पिढी वाचनाकडे वळते आहे, असे त्या म्हणाल्या.

वाचन हे तुम्हाला सुसंस्कृत बनवते. त्यामुळे विविधांगी विषयावर वाचन आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्रात संत परंपरा, परिवर्तनवादी चळवळ, पुरोगामी साहित्याने पिढ्या न पिढ्या वाढल्या आहेत. सहिष्णू समाजाची निर्मिती करण्यासाठी वाचन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नव्या पिढीने अधिकाधिक वाचन करणे आणि लिहिते होणे आवश्यक आहे. आपले राज्य हे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे राज्य आहे. त्यामुळेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाचन चळवळीला बळ देण्याचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे शुभ संदेश वाचून दाखविण्यात आले.

दीप प्रज्वलन आणि ग्रंथपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सहसचिव श्री.महाजन यांनी केले. यावेळी त्यांनी विधिमंडळाच्या मराठी भाषा समिती कक्षाची स्थापना आणि त्याद्वारे करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्त विधिमंडळ सचिवालयातील विविध अधिकारी, कर्मचारी यांनी सादरीकरण केले. यात मीरा सावंत, विनय पाटील, संगीता विधाते, अन्नपूर्णा इंगळे, अनुजा सावंत, रवींद्र ठाकरे,सचिन बोरकर यांनी  त्यांचे वाचनानुभव सादर केले.

सूत्रसंचलन सचिन बोरकर यांनी केले. आभार विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी मानले.  विधिमंडळ सचिवालयातील विविध अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


Tags: Legislative Assembly Speaker Adv. Rahul NarvekarMan SanskarksammuktpeethReadingReading Inspiration Dayघडलं-बिघडलंमाणूस संस्कारक्षममुक्तपीठवाचनवाचन प्रेरणा दिनविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
Previous Post

भाजपाला ठाकरेंप्रमाणेच खरंच शिंदेंही नकोसे?

Next Post

समृध्द मराठी भाषेचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविणार- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

Next Post
Marathi Language Minister Deepak Kesarkar

समृध्द मराठी भाषेचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविणार- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!