मुक्तपीठ टीम
जर तुम्हीही फेसबुक यूजर आहात तर तुम्ही सतर्क रहा. कारण फेसबुकवर एका बगमुळे लोकांचे फॉलोअर्स गायब झाले आहेत. फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांच्या फॉलोअर्समध्ये घट होत आहेत. यात फेसबुक मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनाही या बगचा मोठा फटका बसला आहे. मार्क झुकरबर्गचे फॉलोअर्स फक्त आता हजारोंच्या संख्येने उरलेले आहेत. या फॉलोअर्सची संख्या त्यांच्या पेजवर पाहता येईल.
इतर अनेक यूजर्सनीही त्यांच्या फॉलोअर्सची संख्या घटल्याबद्दल तक्रार केल्या आहे. बनावट फॉलोअर्सच्या छाटणीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे मार्क झुकरबर्गचे सर्व फॉलोअर्सही बनावट होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा एक बग आहे की बनावट अकाउंट क्लिअरन्सचा परिणाम आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु टेक जगतातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बगमुळे देखील असे होऊ शकते, परंतु जर बग फॉलोअर्स घटवत असेल तर तो काही फॉलोअर्स सोडत आहे.
मेटाचा नुकताच हाय-एंड रिअॅलिटी हेडसेट लॉंच
- मेटाने अलीकडेच हाय-एंड रिअॅलिटी हेडसेट सादर केले, जे मार्क झुकरबर्गने त्याच्या फेसबुक पेजवर देखील शेअर केले.
- नवीन हेडसेटला Meta Quest Pro असे नाव देण्यात आले आहे.
- त्याची किंमत १ हजार ५०० डॉलर म्हणजेच १ लाख २३ हजार ४५९ रूपये ठेवण्यात आली आहे.
- हा हेडसेट चेहऱ्यावरील नैसर्गिक भाव देखील ट्रॅक करेल.
- मेटा क्वेस्ट प्रो हे कंपनीचे नवीन उत्पादन आहे.
- यात अनेक तांत्रिक बदल करून सादर करण्यात आले आहे.
- मेटा क्वेस्ट प्रो खास गेमर्सना लक्षात घेऊन लॉंच करण्यात आला आहे.
- मेटा क्वेस्ट प्रो ची १५ दशलक्ष युनिट्स विकली जाण्याची अपेक्षा आहे.