मुक्तपीठ टीम
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन मेळाव्यात नेत्यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत, मधुकर देशमुख, राजन राजे आणि अनिता बिर्जे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५३, ५०० आणि ५०४ तसेच कलम १५३ अंतर्गत मानहानीकारक वक्तव्य, अंतर्गत बदनामी आणि चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागाप्रमुख बाळा गवस यांनी तक्रार दिली आहे.
ठाकरेंच्या ७ जणांवर गुन्हा दाखल!!
- ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
- ठाण्याच्या गडकरी रंगायतनात ठाकरे गटाच्या महाप्रबोधनयात्रेचा शुभारंभ झाला.
- यावेळी सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांनी भाषणे केले.
- या मेळाव्यात यावेळी भास्कर जाधवांनी शिंदेंची नक्कल केली, राऊतांनी राणेंची नक्लल केली, तर अंधारेंनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली, यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
- राजन राजे, अनिता बिर्जे, मधुकर देशमुख यांच्यावरही गुन्हा नोंद झाला आहे.
- शिंदे गटाचे बाळा गवस यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
- या तक्रारीनुसार सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया!!
- विविध प्रसार माध्यमांकडून असे कळले की महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून खासदार राजन विचारे मी स्वतः, आमदार भास्कर जाधव खासदार विनायक राऊत, आणि आमच्या अनिताताई बिरजे यांच्यावरती १५३ अ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत.
- मात्र अजूनही माझ्याकडे रितसर याची प्रत मिळालेली नाही.
- महाप्रबोधन यात्रेतील सगळी भाषण पब्लिक डोमेन मध्ये आहेत.
- ती तपासून घेता येतील मला खात्री आहे त्यातलं एकही वाक्य हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही.
- कायदा माझ्या बापाने लिहिला आहे आणि त्याचा सन्मान राखणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तरीसुद्धा १५३ अ अर्थात चितावणीखोर वक्तव्य या सबबी खाली दाखल झालेला गुन्हा हा आमच्या महाप्रबोधन यात्रेच्या सुरुवातीचा #शुभशकुन आहे असा आम्ही समजतो, असे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणानंतर म्हटले.