Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पशुवैद्यकांनी पशुपालकांकडे जावून जनावरांचे लसीकरण करावे – सचिन्द्र प्रताप सिंह

October 11, 2022
in सरकारी बातम्या
0
Lumpy Diseases

मुक्तपीठ टीम

शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सुचविलेल्या सुधारित शिफारशीचा अवलंब करावा. लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन जनावरांचा औषधोपचार व लसीकरण करावे, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिले.      

“लम्पी आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही.  या रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविल्या जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.  हा रोग माशा, डास, गोचिड इ. कीटकांमार्फत पसरत असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कीटनाशकांची फवारणी करावी, तसेच सर्व पशुपालकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सर्व पशुपालकांना केले आहे.             

लम्पी आजारावरील उपयुक्त औषधांच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लम्पी नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता (इटरन्स) यांना प्रती लसमात्रा रु. ५ प्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले आहे. सर्व खासगी पशुवैद्यकीय व्यावसायीकांनी, सेवादात्यांनी, पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा. यासाठी त्यांनी संबंधीत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा. शासनाने खासगी पशुवैद्यकांना लम्पी आजाराच्या उपचारासाठी कोणतीही बंदी घातलेली नसल्याचे सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.            

राज्यामध्ये दि. १० ऑक्टोबर, २०२२ अखेर ३२ जिल्ह्यांमधील एकूण २ हजार ४०४ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ७६ हजार ९२७ बाधित पशुधनापैकी एकूण ४३ हजार ९२ पशुधन उपचाराद्वारे  रोगमुक्त झाले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १२८.०१ लाख लसमात्रा  उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण १२१.८१ लाख पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगांव, धुळे, अकोला, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे ८७.०६% गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.             

महाराष्ट्रात दि. १० ऑक्टोबर, २०२२ पर्यंत एकूण ३ हजार ६२२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. लम्पी रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पशुपालकांनी लम्पी आजाराच्या संभाव्य  लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.


Tags: Animal Husbandry Commissioner Sachindra Pratap SinghLumpy Skin DiseasesMaharashtraVaccinate Animalsसचिन्द्र प्रताप सिंह
Previous Post

‘आप’ला ईडी ताप! दिल्ली न्यायालय काय म्हणालं? ईडीग्रस्तांना दिलासा…

Next Post

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Next Post
मा.मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग आणि योजनांचा आढावा 2

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा - कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!