मुक्तपीठ टीम
मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) निवडणुकीला सोमवारी वेगळं वळण आल्याचे दिसले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतिस्पर्धी असलेले शरद पवार आणि आशिष शेलार गटांनी युती केली आहे. एवढचं नाही तर पवार-शेलार गटामध्ये शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. क्रिकेट सत्तेसाठी भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी एकत्र आल्याने सर्वांनाच चक्रावून सोडले आहे.
आव्हाड आणि नार्वेकर हे कार्यकारीणीचे उमेदवार!!
- या संघटनेच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेलार यांच्यासह जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, विहंग सरनाईक यांनीही अर्ज दाखल केले.
- संघटनेच्या मावळत्या कार्यकारीणीतील सचिव संजय नाईक यांनीही अध्यक्ष तसेच सहसचिवपदासाठी अर्ज दाखल केला; पण ‘पवार-शेलार गटा’ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचा समावेश नाही.
- याच यादीनुसार आव्हाड आणि नार्वेकर हे कार्यकारीणीचे उमेदवार आहेत.
- याच गटाने मावळत्या कार्यकारीणीतील सदस्य सरनाईक यांनी मुंबई आयपीएल टी-२० प्रमुख पदाची उमेदवारी दिली आहे.
‘शरद पवार गट’ तसेच ‘शरद पवार-आशिष शेलार गट’ असे दोन प्रतिस्पर्धी गट!!
- या निवडणुकीसाठी संदीप पाटील हे ‘शरद पवार गटाचे उमेदवार असतील असे जाहीर करण्यात आले होते.
- ‘पवार गटाने आपले उमेदवार यापूर्वीच जाहीर केले होते.
- त्यांनी निवडणूकीसाठी अर्जही दाखल केले आहेत.
- मात्र आता निवडणूकीचे अर्ज दाखल करण्याच्या नव्याने स्थापन झालेल्या पवार-शेलार गटाने आपले उमेदवार जाहीर केले.
- त्यामुळे सध्या निवडणुकीत ‘शरद पवार गट’ तसेच ‘शरद पवार-आशिष शेलार गट’ असे दोन प्रतिस्पर्धी गट आहेत.
- ‘शरद पवार गटा’ने सोमवारी संध्याकाळी माटुंगा येथे क्लब प्रतिनिधींसह संपर्क कार्यक्रम ठरवला आहे.
- त्यावेळी पवार गटातील उमेदवारांची बैठक होण्याची शक्यता आहे.
- दरम्यान शरद पवार गटाने आपले नाव बदलून मुंबई क्रिकेट ग्रुप केल्याचे सुत्रांकडून कळते आहे.
शरद पवार-आशिष शेलार गटातील उमेदवारांची नावे-
- अध्यक्ष- आशिष शेलार
- उपाध्यक्ष- अमोल काळे
- सचिव- अजिंक्य नाईक
- सहसचिव- दीपक पाटील
- खजिनदार- अरमान मलिक
- कार्यकारीणी सदस्य- जितेंद्र आव्हाड, गौरव पय्याडे, मिलिंद नार्वेकर, खोदादाद येझगिरी, सूरज सामंत, निलेश भोसले, दीपक मिस्त्री अन्य दोन उमेदवारांची निवड शेलार करणार.
- मुंबई प्रीमियर टी-२० लीग
- अध्यक्ष-विहंग सरनाईक
- उपाध्यक्ष- गणेश अय्यर