मुक्तपीठ टीम
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनीअर-१ या पदासाठी ८९ जागा, प्रोजेक्ट इंजिनिअर-१ या पदासाठी ५२ जागा अशा एकूण १४१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. याची लेखी परीक्षा १६ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. नोकरीचे ठिकाण हैदराबाद आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल या विषयात बीई/ बीटेक/ बीएससी इंजिनीअरिंग केलेले असावे. तसेच, पद क्र. १ साठी ०६ महिने अनुभव असावा तर, पद क्र. २ साठी ०२ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे तर, पद क्र.२ साठी ३२ वर्षांपर्यंत वय असावे.
शुल्क
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १७७ रूपये शुल्क आकारले जाणार तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४७२ रूपये शुल्क आकारले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://bel-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeoFbusWGjHbr3RMaD1nmLCc7HGdBHCUbR2jNkNAPpBfw9aOg/viewform
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1cyjTxeISO6gMbqklDUaePEoo_wUQy6lA/view