मुक्तपीठ टीम
देशभरात सायबर फसवणुकीच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातही एक नवा गुन्हा वाढत चालला आहे, तो आहे सेक्सटॉर्शनचा! ऑनलाइन व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तरुण किंवा मध्यमवयीन पुरुषांना लक्ष्य करत ब्लॅकमेल करण्याचे गुन्हे वाढत आहेत. राजस्थानमधील मेवात भागातून सेक्सटॉर्शन टोळीच्या दोन सूत्रधारांना अटक झाली आहे. या टोळीने देशभरातील २००हून अधिक लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. एक मुंबईकर आमदारही सेक्सटॉर्शनचा बळी ठरला होता.
सेक्सटॉर्शन लक्ष्य बहुतेक तरुण आणि मध्यमवयीन पुरुष!
- लैंगिक शोषणाचे बळी बहुतेक तरुण आहेत.
- असे गुन्हे करणारे गुन्हेगारही पुरुष आहेतिशे,!, हेही एक .
- अशा प्रकरणांमध्ये, पीडित लोक लाजेपोटी व भीतीने गप्प राहतात.
- २०१९ मध्ये देशात सायबर खंडणीची सुमारे १८०० प्रकरणे नोंदवली होती.
- लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचाही समावेश होता.
- एनसीआरबीच्या अहवालानुसार, सायबर खंडणीचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदवले गेले आहेत.
नेमकं प्रकरण काय? काय करते ही टोळी?
- टोळीचे सदस्य विविध सोशल मिडिया अॅप्सवर सुंदर मुलींचे फोटो असलेले बनावट प्रोफाइल तयार करतात.
- सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
- रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर ते त्यांच्याशी व्हॉट्सअॅप नंबर शेअर करतात.
- टोळीतील सदस्य व्हिडिओ कॉलची ऑफर देतात.
- व्हिडिओ कॉलवर, मुली त्यांचे कपडे काढताना दिसतात आणि पीडितांना ते काढण्यासाठी आमंत्रित करतात.
- अशाप्रकारे पीडित हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर या टोळीचे सदस्य स्क्रीन रेकॉर्डिंग अॅपच्या माध्यमातून लोकांचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात.
- न्यूड फोटो रेकॉर्ड झाल्यानंतर टोळीचे सदस्य त्यांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करतात.
सावधानता बाळगा सर्तक राहा…
- कोणतीही अश्लील सामग्री ऑनलाइन पाठवणे, प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे बेकायदेशीर आणि दंडनीय आहे.
- असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- या सापळ्यात एकदा अडकले की बाहेर पडणे कठीण होऊन बसते.
- त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
- गेल्या काही वर्षांमध्ये ‘सेक्स्टॉर्शन’च्या घटना दुपटीने वाढल्या आहेत.
- सेक्सटॉर्शनमध्ये भारत जगातील पहिल्या १० देशांमध्ये येतो.
- यामध्ये व्हिएतनाम, ब्राझील आणि अर्जेंटिना याचा समावेश टॉप ३ मध्ये आहे.
- यामध्ये लोकांना हनी ट्रॅपप्रमाणे भक्ष्य बनवले जाते.
- या प्रकारच्या फसवणुकीत स्त्री आणि पुरुष दोघेही सहभागी होऊ शकतात.
- काही वेळा आरोपी एक व्यक्ती नसून संपूर्ण टोळी असू शकते.
- हॅकिंगच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणारे आणि अनेकदा मोठ्या लोकांना अडकवणारे हॅकर्सही या टोळीत आहेत.
- मुले अशा प्रकरणांना बळी पडतात.
- आपले सत्य समोर आले तर आपले आयुष्य उद्ध्वस्त होईल अशी भीती त्यांना वाटते.
- बदनामीमुळे लोक पोलिसांकडे तक्रार करत नाही आणि गुंडांच्या मागण्या पूर्ण करतात.
- याबाबत तक्रार करणारे लोक फार कमी आहेत.
खंडणी उकळणारे नवे गेमिंग अॅप
- मोबाईल गेमिंग अॅपच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर कॉल सेंटर उभारून डेटिंग अॅपच्या माध्यमातून देहविक्रीचा धंदाही चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
- डेटिंग अॅप आणि फेक कॉल सेंटरचे जाळे अशा प्रकारे पसरवले जाते की पोलिसांनाही माग काढणे कठिण जाते.