मुक्तपीठ टीम
नुकतीच लाँच झालेली अकासा एअर लाईन्स प्रवाशांसाठी एक आगळा वेगळी योजना आणली आहे. कंपनी लवकरच पाळीव प्राण्यांना प्रवाशांसोबत उड्डाण करण्याची परवानगी देत आहे. अकासा एअरलाइन्सने त्यांच्या प्रवाशांना नोव्हेंबरपासून प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे.
१५ ऑक्टोबरपासून पाळीव प्राण्यांना प्रवासाची संधी…
-अकासा एअरलाइन १५ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू करणार आहे.
-नोव्हेंबरपासून प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांना सोबत नेण्याची परवानगी दिली जाईल.
-प्रवासादरम्यान पाळीव प्राण्याला पिंजऱ्यात ठेवावे लागेल.
-जनावरांसह प्रवाशांचे वजन ३२ किलोपेक्षा जास्त नसावे.
-जड पाळीव प्राण्यांसाठी इतर पर्याय असतील असे अकासा एअरलाइन व्यवस्थापनाचे स्पष्ट केले आहे.
विमानांच्या संख्येत होणार वाढ…
-अकासा एअरलाइनने या वर्षी ऑगस्टमध्ये आपले ऑपरेशन सुरू केले.
-अकासा एअरलाइन्स लवकरच या सेवेचा विस्तार करणार आहे.
-पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची विमान कंपनीची योजना आहे.
-कंपनी विमानांची संख्या वाढवण्यातही गुंतलेली आहे.
-कंपनी आणखी दीड डझन विमानांची भर घालणार आहे.
राकेश झुनझुनवाला आणि अकासा एअरलाइन्स…
-अकासा एअरलाइनचे सुप्रसिद्ध गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला हे अकासा एअरचे संस्थापक होते.
-अकासा एअरमध्ये त्यांचे ४० टक्के शेअर्स होते.
-त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावावर ५ टक्क्यांहून अधिक हिस्सा होता.
-झुनझुनवालानंतर विनय दुबे यांच्याकडे सर्वात मोठी हिस्सेदारी आहे.
-अकासा एअर लाँच झाल्यानंतर काही दिवसांनी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले.