मुक्तपीठ टीम
सीडॅक अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट या पदावर ३० जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर या पदावर २५० जागा, प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर/ प्रोग्राम डिलीव्हरी मॅनेजर/ नॉलेज पार्टनर या पदांवर ५० जागा, सिनियर प्रोजेक्ट इंजिनीअर/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड या पदांवर २०० जागा अशा एकूण ५३० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- बीई/ बीटेक किंवा सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ एमई/ एमटेक/ पीएचडी
- पद क्र.२- १) ६०% गुणांसह बीई/ बीटेक किंवा ६०% गुणांसह सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ एमई/ एमटेक/ पीएचडी २) ० ते ०४ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) ६०% गुणांसह बीई/ बीटेक किंवा ६०% गुणांसह सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ एमई/ एमटेक/ पीएचडी २) ०९ ते १५ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) ६०% गुणांसह बीई/ बीटेक किंवा ६०% गुणांसह सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ एमई/ एमटेक/ पीएचडी २) ०३ ते ०७ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे तर, पद क्र.२ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.३ आणि ४ साठी ५६ वर्षांपर्यंत वय असावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी सीडॅकच्या अधिकृत वेबसाइट https://www.cdac.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://careers.cdac.in/advt-details/CORP-2992022-WTM08