मुक्तपीठ टीम
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी अतिशय वेगाने वाढत आहे. दररोज कंपन्या त्यांची नवीन उत्पादने बाजारात लाँच करत आहेत. आताच जीटी फोर्स इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनीने भारतीय बाजारात दोन किफायशीर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. या दोन लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरची नावे ‘जीटी सोल वेगास’ आणि ‘जीटी ड्राईव्ह प्रो’ अशी आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ४७,३७० रुपये आहे. चला जाणून घेऊया या स्कूटरचे खास फिचर्स…
जीटी सोल वेगास
- कंपनीने लाँच केलेली ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
- कंपनीने या स्कूटरला दोन व्हर्जनमध्ये लाँच केले आहे.
- पहिली ६०व्ही २८एएच क्षमतेची लीड ऍसिड बॅटरी आणि दुसरी ६०व्ही २६एएच क्षमतेच्या लिथियम आयन बॅटरी पॅकसह.
- त्याच्या लीड अॅसिड बॅटरी पॅकमध्ये एका चार्जमध्ये ५०-६० किमीची रेंज देण्याची क्षमता आहे
- पूर्ण चार्ज होण्यासाठी ७-८ तास लागतात.
- त्याच्या लिथियम आयन बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४-५ तास लागतात.
- लिथियम आयन बॅटरी एका चार्जवर ६०-६५ किमीची रेंज मिळते.
- या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास आहे.
जीटी ड्राइव्ह प्रो
- कंपनीने जीटी ड्राइव्ह प्रो सुद्धा दोन व्हर्जनमध्ये सादर केली आहे.
- ही इलेक्ट्रिक स्कूटर ४८व्ही २८ए एच क्षमतेची लीड ऍसिड बॅटरी आणि ४८व्ही २६ए एच लिथियम आयन बॅटरी पॅक मिळतो.
- त्याची लीड अॅसिड बॅटरी एका चार्जवर ५०-६० किमीची रेंज देऊ शकते.
- लिथियम-आयन बॅटरी ६०-६५ किमीची रेंज देण्याची क्षमता आहे.
जीटी ड्राइव्ह प्रो ची काही खास वैशिष्ट्ये…
- या स्कूटरमध्ये सेंट्रल लॉकिंग, रिव्हर्स मोड, पार्किंग मोड आणि मोबाईल चार्जिंग सारखे फीचर्स आहे.
- या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मोटरवर १८ महिन्यांची वॉरंटीही दिली आहे.
- कंपनी बॅटरी पॅकवर १-३ वर्षांची वॉरंटी देखील देत आहे.
जीटी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत
- जीटी सोल वेगास लीड ऍसिड – ४७,३७० (एक्स-शोरूम)
- जीटी सोल वेगास लिथियम आयन – ६३,६४१ (एक्स-शोरूम)
- जीटी ड्राइव्ह प्रो लीड ऍसिड – ६७,२०८ (एक्स-शोरूम)
- जीटी ड्राइव्ह प्रो लिथियम आयन – ८२,७५१ (एक्स-शोरूम)