मुक्तपीठ टीम
आज नवमी. नवरात्रोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहचलाय. राज्यातच नाही देशभरात देवींची मंदिरं ऊर्जेनं सळसळत आहेत. जालना शहराची आराध्य देवता असलेल्या दुर्गादेवी मंदिरात भक्तांची रिघ आहे. तर भारतातील दुसरं सरस्वती मंदिर जालन्यातच आहे. तिथंही नवरात्रोत्सव अगदी जल्लोषात साजरा होत आहे.
घटस्थापनेपासून सुरु झालेला नवरात्रोत्सवातील भक्तीच्या लाटाना आता नवमीपर्यंत उधाण आलंय. मराठवाड्यातील जालन्यातही देवींच्या दोन प्रसिद्ध मंदिरांमध्ये उत्सवी उत्साह ओथंबलाय. प्रत्येक दिवशी सकाळ-संध्याकाळची आरती, पूजापाठ, देवीचा अभिषेक, सप्तशतीचे पाठ यामुळे मंदिरांमधील वातावरण भक्तीमय झालं आहे.
जालनाच्या दुर्गादेवी मंदिराची स्थापना १८९५ मध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या काळात झाली होती. अतिशय घनदाट जंगलात असलेल्या या मंदिराचे रुप कालांतराने बदलत गेले.जालना शहराचा विकास होत गेला आणि मंदिराच्या आजूबाजूला वस्ती वाढली. अतिप्राचीन मंदिरातील दुर्गा मातेची मूर्ती ही स्वयंभू असून भक्तांच्या नवसाला पावणारी आहे.
सरस्वती ही विद्येची देवता आहे, भारतात सरस्वती देवीचे फक्त दोनच मंदिरे आहेत, त्यापैकी पहिले आंध्रप्रदेशातील बासर येथे तर दुसरे जालना येथे. त्यामुळे जालना शहरातील पालक आपल्या लहान मुलांना बालवाडीत टाकण्याआधी सरस्वती मातेच्या मंदिरात आणून पाटी पेन्सिलची पूजा करतात व बालकांवर विद्येची देवता सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना देवीकडे केली जाते.
समर्थ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थी महिलांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या सरस्वती मंदिरात संगीत सेवा दिली. या वेळी विद्यालयातील महिला विद्यार्थिनींनी देवीची भक्तीगीत,गोंधळ गीत सादर करत सरस्वती मातेचा जागर केला. सरस्वती मंदिरात संगीत सेवा करायला मिळाल्याने या महिलांनी अतिशय आनंद व्यक्त केला.
पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळलेली असते. घटस्थापना व नवरात्रोत्सवासाठी मंदिराला रंग-रंगोटीचे काम, विद्युत रोषणाईचे काम करण्यात आले आहे. मंदिरासमोरील मोकळ्या जागेत रहाट पाळणे, झोके, लहान मुलांचे मनोरंजनाचे खेळ इथे १० दिवस असतात. दुर्गा देवी भक्तांच्या संरक्षण करत आली आणि वाईट प्रवृत्ती वाईट गोष्टींचा नाश करत आली.
पाहा: