मुक्तपीठ टीम
वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरेंना मोठा धक्का देत वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली. दसरा मेळाव्याच्या काही दिवसांआधीच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र शिंदे गटाच्या दाव्यानंतर वरळीतील महिला शिवसैनिक आणि दुपारी शिंदे गटात सामील झालेले शिवसेना पदाधिकारी संध्याकाळी मातोश्रीवर दाखल झाले. वरळीतील शिवसैनिक शिंदे गटात गेले ही खोटी बातमी असल्याचा दावा यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
शिंदे गटात गेल्याची खोटी बातमी!!
- वरळी कोळीवाड्यामधील सगळे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, नगरसेवक, उपविभाग प्रमुख सर्व एकत्र येऊन मातोश्रीवर दाखल झाले.
- वरळीतील शिवसैनिक शिंदे गटात गेले ही खोटी बातमी असल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
- कुठेतरी निष्ठा मनामध्ये शांत बसू देत नव्हती म्हणून आज सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलो.
- जे गेले ते दोन चार दिवसात स्वतः येऊन गौप्यस्फोट करतील असे शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शिंदे यांनी सांगितले.
- महाराष्ट्र एका बाजूला आणि आम्ही वरळीकर एका बाजूला असं चित्र ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी या ठिकाणी एक मोठा कट रचला जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.
- वरळीतील विधानसभेची सीट असेल किंवा दक्षिण मुंबईची लोकसभेची सीट असेल हे पहिल्यापेक्षा जास्त मताने निवडून येतील हा खऱ्या
- अर्थाने आम्ही दिलेला धक्का असेल असे देखील सुनील शिंदे म्हणाले.
वरळीकर आदित्य ठाकरेंच्या पाठिशी!!
- शिवसैनिक हे मातोश्री येथे दाखल होताच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.
- शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर येऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी केली.
- शिंदे गटात काहींनी प्रवेश केल्याचा परिणाम पक्षावर होणार नसल्याचे हे दाखवून देण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला आहे.