मुक्तपीठ टीम
रविवारची साप्ताहिक सुट्टी तुम्ही मस्त एन्जॉय करत असताना आपल्या इस्त्रोनं मोठी कामगिरी बजावली आहे. सकाळी १० वाजून २४ मिनिटांना पीएसलव्ही रॉकेटने १९ उपग्रह अंतराळात झेपावले आहेत. सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी या प्रक्षेपणाची उलटी मोजणी सुरु झाली होती. या १९ उपग्रहांमध्ये एक ब्राझिलचा आहे. १३ उपग्रह अमेरिकेतील आहेत. या उड्डाणाला भारतीय अंतराळ तंत्रज्ञानावरील जागतिक विश्वासाचं प्रतिक मानलं जात आहे.
पीएसएलव्ही रॉकेटचा मोठा उड्डाण कालावधी
आजचे उड्डाण हे पीएसएलव्ही रॉकेटसाठी मोठ्या उड्डाण कालावधीचे असेल. उड्डाणासाठी एक तास ५५ मिनिटे आणि ७ सेकंदांचा कालावधी आहे. सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी उलटी मोजणी सुरु झाल्यानंतर दीड तासांनी पीएसएलव्ही रॉकेटने उड्डाण केले.
आजवर इस्त्रोकडून ३४२ परदेशी उपग्रह अंतराळात
आजचे उड्डाण यशस्वी झाल्यानंतर इस्त्रोने अंतराळात पाठवलेल्या परदेशी उपग्रहांची संख्या ३४२वर पोहचली आहे.
- आजच्या १८ पैकी ३ उपग्रह हे भारतातील शिक्षण संस्थांचे आहेत.
- त्यापैकी एक नागपूरमधील संस्थेचाही आहे. नागपूरच्या जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह आहे.
- अन्य दोन श्रीपरंबदूर आणि कोयबंतूरच्या शिक्षण संस्थांचे आहेत.
- चौथा उपग्रह सतीश धवन सॅटेलाइट स्पेस किड्स इंडियाने तयार केला आहे.
- उरलेले १४ परदेशी उपग्रह आहेत.