मुक्तपीठ टीम
केरळ न्यायालयाने एका ४१ वर्षीय व्यक्तीला पॉक्सो कायद्याअंतर्गत १४२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसच, ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या आरोपीला १० वर्षांच्या मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे.
केरळमध्ये एक पठाणमथिट्टा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील एका न्यायालयाने आरोपी व्यक्तीला १४२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच चर्चेत आले आहे. या प्रकरणावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. १४२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या नराधमाने १० वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दोषीने १० वर्षांच्या निष्पाप मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार केला होता. जिल्हा पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, पठाणमथिट्टा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयकुमार जॉन यांनी दोषी आनंदन पीआरला १४२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याच्यावर ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
या नराधमाने २ वर्ष पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले
- दोषी आनंदन पीआर उर्फ बाबू हा पीडितेचा नातेवाईक असून तो त्याच्या घरी राहत होता.
- दोषी हा 10 वर्षीय पीडितेचा नातेवाईक आहे. त्याच्या ओळखीच्या व्यक्तीवरही त्याने दोन वर्षे सतत अत्याचार केले.
- आरोपीने २०१९-२०२१ या कालावधीत मुलीचे लैंगिक शोषण केले.
- हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सोसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
- त्यानंतर पोलिसांच्या तपासात त्याच्यावरील आरोप खरे ठरले.
- त्यानंतर, पठाणमथिट्टा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयकुमार जॉन यांनी त्याला पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या कलम ५०६ अंतर्गत दोषी ठरवले.