मुक्तपीठ टीम
कानपूरच्या घाटमपूर येथे शनिवारी साद-भितरगाव रस्त्यावर मुंडण करून घरी परतणाऱ्यांची ट्रॉली उलटून २६ जणांचा मृत्यू झाला. पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून ट्रॉली काढली असता त्याखाली मृतदेहांचा खच होता. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. लहान मुले पाण्यात बुडाली, बऱ्याच वेळानंतर त्यांचे मृतदेह पाण्यात आढळून आले. नातेवाईक रडत होते, आरडाओरड करत होते, खड्ड्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्याची विनवणी करत होते. घटनास्थळी पोहोचलेल्या आजूबाजूच्या गावातील लोक पाण्याने भरलेल्या खड्ड्यातील पाण्यामध्ये घुसले, त्यानंतर मृतदेह पायांना लागल्याने ते घाबरले. थरथरत्या हातांनी गावकरी एक एक करून मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढत होते. कुणाच्या हातात मुलाचा मृतदेह तर कुणाच्या हातात त्या मुलाच्या आईचा मृतदेह. मुलांचे मृतदेह बाहेर काढणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.
कानपूर घाटमपूर दुर्घटनेची वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधीकडून पाहणी
- घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी पोहोचले असता, २४ मृतदेह एकत्र पाहून हेलावले.
- एकाच गावातील २६ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
ग्रामस्थांचे विविध प्रकारे बचाव कार्य…
- एकामागून एक लोकांना बाहेर काढले जात होते.
- लोकांनी कसा तरी जीव वाचवण्यासाठी धडपड केली.
- काही जण बुडालेल्यांना तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करत होते.
- काही छाती दाबून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.
- सर्वजण देवाकडे प्रार्थना करत होते की या लोकांचा कसा तरी उद्धार होईल.
- या दुर्घटनेत गावातील तीन कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
- कोर्टा गावातील रहिवासी कल्लूची पत्नी विनीता ही त्यांची दोन मुले शिवम आणि सानवीसह कार्यक्रमाला गेली होती.
- त्याच वेळी लीलावती आपली मुलगी मनीषा आणि मुलगा छोटू आणि जयदेवी आपला मुलगा रवीसह मुंडन समारंभाला गेली.
- या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला.
- त्यांच्या कुटुंबात फक्त विनीता, लीलावती आणि जयदेवी यांचे पती उरले आहेत.
- काही क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
अंधारामुळे बचाव कार्यात अडचण
- रात्रीच्या अंधारात हा अपघात झाला.
- खंतीत काहीच दिसत नव्हते.
- मशाली घेऊन गावकरी आले.
- सर्व लोकांनी वाहनांचे हेडलाइट लावले.
- मग कसेबसे बचावकार्य सुरू झाले.
- एकेरी रस्ता हे देखील अपघाताचे प्रमुख कारण होते.