मुक्तपीठ टीम
गूगल या सर्च इंजिन कंपनीवर अनेक सिक्रेट सर्च टर्म्स आढळतात, ज्या सर्च करताच स्क्रीनवर मजेशीर इफेक्ट पाहायला मिळतो. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या डीएआरटी मोहिमेच्या यशाच्या पार्श्वभूमीवर अशाच एका प्रभावाचा समावेश करण्यात आला आहे. गुगलवर या मिशनबद्दल सर्च करणाऱ्यांना उपग्रहांचा स्फोट मजेदार पद्धतीने पाहायला मिळत आहे.
नासाच्या डीएआरटी अंतराळयानाची रचना उल्कापिंडापासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली असून त्याची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. २७ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजून ४४ मिनिटांनी हे अंतराळयान डिमॉर्फोस नावाच्या उल्केशी आदळले आणि मोहीम यशस्वी झाली. आपल्या ग्रहाच्या प्लॅनेटरी डिफेन्स सिस्टमची ही पहिली चाचणी होती, ज्याकडे एक मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.
गुगलवर ‘नासा डीएआरटी’ सर्च केलंत दर दिसणार मजेदार स्फोट!
- गुगल सर्चवर जाऊन ‘नासा डीएआरटी’ टाइप करून सर्च करावे लागेल.
- टाइप करून एंटर करताच, स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक अॅनिमेटेड उपग्रह दिसेल आणि त्याचा स्फोट होईल.
- त्यानंतर संपूर्ण स्क्रीन उजवीकडे झुकेल, जे सूचित करेल की उपग्रह तुमच्या स्क्रीनवर आदळला आहे.
दरवर्षी अनेक उल्का पृथ्वीच्या दिशेने जातात किंवा त्याच्या अगदी जवळून जातात. जर अशी उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळली तर त्याचा अर्थ मोठा विनाश होऊ शकतो. यामुळेच नासाच्या शास्त्रज्ञांच्या टीमने आपल्या ग्रहाची संरक्षण यंत्रणा तयार केली असून अशा उल्का अवकाशातच नष्ट होऊ शकतात.
नासाने ट्विटरवर व्हिडीओ केला शेअर
- गुगलच्या इस्टर एगचा व्हिडीओ नासाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर करण्यात आला आहे.
- नासाने लिहिले, “गुगल सर्च काहीतरी धमाका करू शकतो! गुगलवर ‘नासा डीएआरटी’ शोधावे लागेल आणि ब्राउझरमध्ये ग्रहांच्या संरक्षणाची झलक दिसेल.”