मुक्तपीठ टीम
आपण सर्वजण गुगलचा वापर करतो. गुगल सर्वांच्या जीवनातील एक अमूल्य भाग बनला आहे. आजच्या या स्मार्ट युगात लहानांपासून-मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्ट फोन पहायला मिळतो. स्मार्ट फोन हे मुळतः 2 गोष्टीवर चालते. पहिल म्हणजे इंटरनेट आणि दुसर गुगल. आधुनिक काळात गुगलशिवाय जगाचा विचार करणे शक्य नाही. गुगलला जगात येऊन २७ सप्टेंबर २०२२ रोजी २४ वर्ष झाली आहेत.
२७ सप्टेंबर हा दिवस गुगलचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. गुगल नेहमीच या दिवशी आपला वाढदिवस साजरा करत नाही. याआधी गुगल ४ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत असे परंतु, नाव बदलल्यानंतर कंपनीने याची तारीख देखील बदलली. आता कंपनी ४ सप्टेंबर ऐवजी २७ सप्टेंबरला हा दिवस साजरा करते.
गुगल विषयी सविस्त माहिती…
- गुगलची सुरुवात लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन या दोन मित्रांनी मिळून केली आहे.
- लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांची भेट तेव्हा झाली जेव्हा, सर्जी त्यांना कॉलेजच्या दौऱ्यावर घेऊन जात होते.
- भेटीच्या एका वर्षातच दोघांची पार्टनरशिप झाली आणि त्यांनी मिळून एक सर्च इंजिन तयार केले.
- आधी त्यांनी या सर्च इंजिनला बॅकरब असे नाव दिले पण नंतर ते बदलून गुगल केले.
- १९९८मध्ये गुगलची कंपनी म्हणून नोंदणी करण्यात आली.
गुगलला ‘गुगल’ हे नाव कसे मिळाले?
- १९९८ मध्ये, जेव्हा दोन्ही मित्र एकत्र गुगल सुरू करत होते, तेव्हा त्यांनी ‘Googol-गुगोल’ नाव ठेवण्याचा निर्णय घेतला.
- ते दोघेही अभियंते होते आणि त्यांना या शब्दाचा अर्थ माहीत होता. पण नंतर दोन्ही मित्रांनी मिळून एक निर्णय घेतला आणि त्याचे नाव गुगल ठेवले.
- जगाची सर्व माहिती एकाच ठिकाणी जमा करणे हा यामागे दोन्ही मित्रांचा उद्देश होता.
गुगलचे नाव देण्यामागचा उद्देश काय होता?
. १९२० मध्ये, गणित तज्ञ एडवर्ड कॅसनर यांनी त्यांचा पुतण्या मिल्टन सिरोटा यांना १०० शून्य असलेल्या संख्येसाठी नाव निवडण्यास मदत करण्यास सांगितले.
. त्याला उत्तर म्हणून मिल्टनने ‘गुगो’ हे नाव सुचवले. त्यांच्या पुतण्याकडून ही सूचना मिळाल्यानंतर कॅसनर यांनी व्यासपीठाला गोगो असे नाव देण्याचा निर्णय घेतला.
. नंतर १९४० मध्ये हा शब्द शब्दकोशात समाविष्ट करण्यात आला. नंतर कॅसनर यांनी गणित आणि कल्पना नावाचे पुस्तक लिहिले, त्या पुस्तकात त्यांनी प्रथमच गुगोल हा शब्द वापरला.