Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

September 25, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार सोहळा

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी सुशिल शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुशिल शिंदे हे मुंबईच्या कांदिवली भागातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्‍याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिक हा नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचा  विद्यार्थी  आहे.  दिवेश हा नागपूर येथील पशू वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या दोघांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती भवनच्या दरबारहॉल मध्ये ‘राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार २०२०- २१’ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, युवक कल्याण विभागाचे  सचिव संजय कुमार आणि क्रीडा विभागाच्या  सचिव सुजाता चतुर्वेदी  उपस्थित होत्या.

या विशेष कार्यक्रमात देशाच्या विविध भागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी तीन श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. यावेळी एकूण ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या श्रेणीत देशातील एकूण १० कार्यक्रम अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. यात मुंबई  येथील कार्यक्रम अधिकारी सुशिल शिंदे यांचाही गौरव करण्यात आला त्यांनी ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चैताली चक्रवर्ती यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वरूप एकनाथ शिंदे यांना रजतपदक, प्रमाणपत्र आणि  दीड लाख रुपये तर डॉ. चक्रवर्ती यांना चषक आणि २ लाख रुपये प्रदान करण्यात आले.

एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कंपोस्टिंग, ऊर्जा संरक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केले. शेतकऱ्यांनी  पिकविलेल्या सेंद्रीय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, रक्तदान शिबीर आयोजन आणि वृक्षारोपण क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकांच्या श्रेणीत देशभरातील ३० विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या श्रेणीत महाराष्ट्रातून नंदुरबार येथील प्रतिक कदम आणि नागपूर येथील विद्यार्थी दिवेश गिन्नोर यांनाही गौरविण्यात आले. प्रत्येकी रजतपदक, प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रतिक कदम यांनी वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी ४ हजारांहून अधिक सापांचा तसेच, मोर आणि बिबट्यांच्या पिलांचा जीव वाचवून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. कोविड महामारीच्या काळात स्वत: मास्क तयार करून गरजूंना त्याचे वाटप केले. कोविड प्रतिबंधात्मक  लसीकरणाबाबत जनजागृती करुन त्यांनी  लसीकरणाबाबत नागरिकांना प्रोत्साहित केले. त्यांनी रक्तदान आणि वृक्षारोपण कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

दिवेश गिन्नारे यांनी शासनाच्या सांप्रदायिक सौहार्द निधी मध्ये ११ हजार ६८८ रुपये  गोळा करून जमा केले. गिन्नारे यांनी  विविध जनजागृतिविषयक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.


Tags: MaharashtraNSS AwardPresident Draupadi Murmuमहाराष्ट्रराष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार
Previous Post

लम्पी: राज्यातील २१,९४८ बाधित पशूधनापैकी ८०५६ पशूधन उपचाराने झाले बरे

Next Post

वरळी-शिवडी उन्नत मार्ग बाधितांना न्याय देण्यासाठी उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
Eknath shinde..

वरळी-शिवडी उन्नत मार्ग बाधितांना न्याय देण्यासाठी उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!