मुक्तपीठ टीम
जम्मू पोलिसांनी मोठी कारवाई करत माजी मंत्री जतिंदर उर्फ बाबू सिंहला अटक केली आहे. हवाला प्रकरणात फरार असलेले माजी मंत्री बाबू सिंह यांना पोलिसांनी कठुआ येथून अटक केली. माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू पोलिसांनी हवाला प्रकरणात फरार असलेल्या जतिंदर सिंहला कठुआ जिल्ह्यातून अटक केली आहे.
जम्मू-काश्मीर, पीओके आणि बाल्टिस्तानला हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांसोबत जोडून एक वेगळा देश निर्माण करावा, असे माजी मंत्री बाबू सिंह यांना वाटत होते. नेचर मॅनकाइंड फ्रेंडली ग्लोबल पार्टीची स्थापना करून बाबू सिंह यासाठी सीमेपलीकडून पैसे गोळा करत होते. जम्मूच्या तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात राज्य तपास यंत्रणा म्हणजेच एसआयएने हे आरोप केले आहेत.
दहशतवाद्यांशी संगनमत देशविरोधी कारवाया करण्याचा कट!
- मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी जम्मू पोलिसांनी हवाला प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीला अटक केली होती आणि त्याच्याकडून पैसे जप्त केले होते.
- यानंतर याप्रकरणी आणखी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, मात्र तेव्हापासून माजी मंत्री जतिंदर सिंह फरार होते.
- पोलिसांनी हवालाकडून ६.९० लाख रुपयांची मोठी रक्कम जप्त केली आहे.
- ३१ मार्च रोजी पोलिसांनी जम्मूच्या गांधी नगर भागात कोकरनाग येथील रहिवासी मोहम्मद शरीफ शाह याला हवाला पैशांसह पकडले.
- पोलीस चौकशीत त्याने सांगितले की, कठुआ येथील रहिवासी बाबू सिंह याने त्याला श्रीनगरमधून पैसे घेण्याचे काम दिले होते.
- या अटकेनंतर बाबूसिंह फरार झाला, त्याला ९ एप्रिल रोजी पकडण्यात आले.
- बाबू सिंह याने शाह यांना श्रीनगरहून हवालाचे पैसे आणण्यास सांगितले. या पैशातून देशविरोधी कारवाया केल्या जाणार होत्या.
- बाबू सिंग हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी मोहम्मद हुसैन खतीब, भदेरवाह येथील रहिवासी आणि पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या याच्या संपर्कात होता.
बाबूसिंहने पैसे गोळा करण्यासाठी दुबईलाही भेट दिल्याचे सांगण्यात आले. हिजबुलशिवाय बाबू सिंहचे नेटवर्क जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटशीही संबंधित होते. ग्लोबल पार्टीला पाकिस्तानकडून निधी मिळत असलेल्या जम्मू-काश्मीर, पीओके आणि बाल्टिस्तानला जोडून एक स्वतंत्र देश निर्माण करायचा होता. ग्लोबल पार्टीला जम्मू-काश्मीरच्या चलन, परराष्ट्र व्यवहार आणि वित्त यावर भारत आणि पाकिस्तानचे संयुक्त नियंत्रण हवे आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी शहा यांना पक्षाचे सचिव बनवण्यात आले आणि खतीबच्या माध्यमातून हवालाचे पैसे काश्मीरमध्ये आणि नंतर बाबू सिंह यांच्याकडे
ट्रान्सफर करण्यासाठी एक चॅनल तयार करण्यात आला.
बाबू सिंहचा हिजबुलशी संबंध असल्याचे पुरावे
- बाबू सिंहचे हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याचे सबळ पुरावे असल्याचे एसआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.
- सिंह यांचा मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे स्पष्ट करतात की त्यांची रचना देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणारी होती.