मुक्तपीठ टीम
पंजाबमधील चंदीगड विद्यापीठात विद्यार्थिनींच्या अंघोळीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी चौथी अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी माहिती दिली की पंजाब पोलिसांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशमध्ये तैनात असलेल्या एका सैनिकाला अटक केली आहे. संजीव सिंग असे अटक केलेल्या सैनिकाचे नाव असून, तो विद्यार्थीनीला ब्लॅकमेल करत असल्याचा संशय आहे.
पोलीस या जवानाला मोहालीला आणत आहेत. असे सांगितले जात आहे की, लष्कराचा जवान आरोपी तरुणीला व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत असे. अटक करण्यात आलेला जवान हा जम्मूचा रहिवासी आहे.
लष्कराचा जवान तरूणीला व्हिडीओ बनवण्यास भाग पाडत असे…
- अरुणाचल प्रदेशातील एटा नगरजवळ तैनात असलेला जम्मूचा रहिवासी आर्मी जवान संजीव आरोपी तरुणीला व्हिडीओ बनवण्यासाठी ब्लॅकमेल करत असे.
- वसतिगृहातील इतर मुलींचे व्हिडीओ बनवण्यासाठी लष्कराचा जवान तरुणीवर दबाव टाकत होता.
- आरोपी मुलीच्या प्रियकराने लष्कराच्या जवानाला तिचा व्हिडीओ पाठवला होता.
- लष्करातील जवान तो व्हिडीओ लिक करण्याची धमकी देऊन व्हिडीओ बनवण्यासाठी दबाव टाकत होता.
- तपासा करत असताना पोलिसांनी सांगितले की, मुलीने वसतिगृहातील इतर मुलींचे व्हिडीओ बनवले नाहीत.
लष्कराच्या जवानाचे नाव कसे समोर आले?
- पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याचा फोन तपासला असता याप्रकरणात लष्कराच्या जवानाच्या भूमिकेची माहिती समोर आली.
- तपासात आरोपी विद्यार्थिनीशी व्हॉट्सअॅप चॅट्सचे काही कथित स्क्रीनशॉट देखील सापडले, ज्यावरून असे दिसून आले की व्हिडिओ बनवण्यासाठी तिला ब्लॅकमेल केले जात आहे.
- त्यानंतर चौथ्या संशयिताचेही नाव तपासादरम्यान पुढे आले.
एसआयटीने तिन्ही आरोपींची चौकशी केली… सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली
- पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने चंदीगड विद्यापीठात आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींची चौकशी केली.
- मोहालीतील खरार येथील न्यायालयाने विद्यार्थिनीसह तिन्ही आरोपींना सोमवारी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
- पोलीस उपमहानिरीक्षक जीपीएस भुल्लर म्हणाले की, एसआयटी आणि फॉरेन्सिक तज्ञांनी चंदीगड विद्यापीठाच्या सार्वजनिक सुविधांनाही भेट दिली आहे.
- वसतिगृहाच्या वॉर्डनलाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे भुल्लर यांनी सांगितले.
- पंजाब पोलिसांच्या राज्य सायबर सेलकडून तिन्ही आरोपींच्या मोबाइल फोनचा डेटा मिळवला जाईल, असे ते म्हणाले.
- या व्हिडीओबाबत विद्यार्थिनींच्या आरोपांची एसआयटी चौकशी करेल, असे भुल्लर म्हणाले. कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही, असे ते म्हणाले.