मुक्तपीठ टीम
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे, बहुतेक लोकांचा कल हा सीएनजी आणि एलपीजी सारख्या इतर इंधन पर्यायांवर चालणाऱ्या वाहनांकडे वाढत आहे. सध्या मार्केटमध्ये अशाही कार आहेत ज्या त्यांच्या सर्वोत्तम मायलेजसाठी ओळखल्या जातात, अलीकडेच मारुती सुझुकीने आपला नवीन सेलेरियो सीएनजी कार लॉंच केली आहे. ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे की, या कारमध्ये ३५ किमीपर्यंत मायलेज देण्याची क्षमता सक्षम आहे. अशा परिस्थितीत, मायलेजमुळे, बहुतेक लोक सीएनजी कारची निवड करत आहेत, ज्यामुळे इंधनाच्या वापरावर आणि त्याच्या किंमतीवर देखील परिणाम होत आहे.
सीएनजी कार खरेदी करणे खरोखरच फायदेशीर आहे का?
- सीएनजीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, देशाच्या राजधानीत त्याची किंमत दिल्लीत ७५.६१ रुपये, मुंबईत ८० रुपये, बंगळुरूमध्ये ८६ रुपये आणि लखनऊमध्ये ९२ रुपये आहे.
- एक काळ असा होता जेव्हा २०१७ मध्ये दिल्लीत सीएनजीची किंमत फक्त ४६ रुपये होती. मात्र आता रस्त्यावर सीएनजी वाहनांची संख्या वाढत असल्याने वापर आणि किंमत या दोन्ही गगनाला भिडत आहेत.
सीएनजी वाहनांचे फायदे
- सीएनजी वाहनांचा सर्वाधिक फायदा प्रदूषणातून होतो. सीएनजी वाहने इतर कोणत्याही इंधनापेक्षा कमी प्रदूषण करतात.
- पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी ९०% कमी प्रदूषण करते.
- याशिवाय ही वाहने तुम्हाला आरामदायी ड्रायव्हिंगचा आनंदही देतात.
- डिझेल इंजिनच्या तुलनेत सीएनजी वाहने जास्त मायलेज देतात.
सीएनजी वाहनांचे तोटे
- सीएनजी वाहनांचे सर्वात मोठे नुकसान त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम म्हणून दिसून येतो.
- कार सीएनजी मोडमध्ये सुरू केल्यावर कार्यक्षमतेच्या बाबतीत थोडासा डाउनग्रेड होतो.
- सीएनजीवर चालवल्याने तुमच्या कारचा टॉप स्पीड देखील कमी होतो. तसेच, कमी आरपीएमवर गाडी चालवताना इंजिन अधिक चांगले चालते.
- पण हायवे किंवा एक्स्प्रेस वेवर सीएनजी कार जास्त वेगाने चालवली तर इंधनाचा वापर वाढतो.
- सीएनजी कारमध्येही जागेची मोठी समस्या आहे. मागे दिलेल्या लगेज स्पेसबद्दल म्हणजेच डिग्गीत सीएनजी टँकमुळे अतिरिक्त जागा उरत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या गाडीत जड सामान ठेवायचे असेल तर ते मागे किंवा पुढच्या सीटवर ठेवावे लागते.
- जर ४ जण जड सामानासह प्रवास करत असतील तर. तर, मग ही समस्या अधिकच बिकट होते.