Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

September 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Union Finance Minister Nirmala Sitharaman honored with Surya Bhushan National Award

मुक्तपीठ टीम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार-२०२२’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराकरिता सीतारामन आल्या होत्या. त्यावेळी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
भारताचा नकाशा असलेले सन्मानचिन्ह, मानपत्र, ‘सूर्यदत्त’चे वैशिष्ट्यपूर्ण उपरणे व माहिती पुस्तिका असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रसंगी आमदार भीमराव तापकीर, आमदार प्रा. राम शिंदे, राहुल कुल, ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, माजी नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे पाटील, सरपंच पियुषा दगडे पाटील, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली निर्मला सितारामन यांच्या कुशल अधिपत्याखाली भारतीय अर्थव्यवस्था सात टक्के इतक्या जीडीपी दराने प्रभावित आहे. विश्वास आणि पारदर्शकता या तत्वावर अर्थव्यवस्था काम करत आहे. एकंदरीत आर्थिक प्रगती आणि योग्य वाटचाल यामुळे भारतीय लोकशाही गतीने पण संयमित आणि दमदार वाटचाल करत आहे. सीतारामन यांच्या प्रभावी नेतृत्वात भारत शाश्वत आर्थिक प्रगती करेल हा विश्वास वाटतो आणि त्यामुळे त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा आदर करण्यासाठी त्यांना सूर्यभूषण राष्ट्रीय पूरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले.”
‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी ‘सूर्यदत्त’ संस्थेप्रती आभार व्यक्त केले. ‘सूर्यदत्त’च्या वतीने ज्ञानदानाचे कार्य अतिशय चांगल्या रीतीने होत असल्याचे सांगत त्यांनी ‘सूर्यदत्त’ परिवाराला शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्काराने प्रा. आनंद संकेश्वर, शास्त्रज्ञ डॉ. के. सिवन, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते वजुभाई वाला, लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर, मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, मनिंदर सिंग बिट्टा, श्याम जाजू यांना, तर सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. शकुंतला काळे, माजी राज्यमंत्री आदिती तटकरे पोलीस अधिकारी संजय जाधव, चंद्रशेखर सावंत यांना गौरविण्यात आले आहे.

Tags: Proff Sanjay ChordiyaSuryadatta Group of InstitutesSushma ChordiyaUnion Finance Minister Nirmala Sitharamanकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनप्रा. डॉ. संजय चोरडियासुषमा चोरडियासूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
Previous Post

सीमा रामदास आठवलेंचा वाढदिवस: ब्राह्मणांचा मंत्र जागर, पुरोहितांना दिवाळी फराळ आणि दृष्टीहीन मुलींना स्नेहभोजन!

Next Post

अदानी-अंबानी यांच्यातील ‘नो-पोचिंग’ करार म्हणजे नेमकं काय? कसा होणार दोन्ही समुहांच्या कर्मचाऱ्यांवर परिणाम…

Next Post
Adani and ambani

अदानी-अंबानी यांच्यातील 'नो-पोचिंग' करार म्हणजे नेमकं काय? कसा होणार दोन्ही समुहांच्या कर्मचाऱ्यांवर परिणाम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!