मुक्तपीठ टीम
स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दु:खद निधन झाले. जीवन मरणाशी झुंज देत असताना अखेर ही झुंज अपयशी ठरली. ४२ दिवसांहून अधिक काळ ते एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल होते. १० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. राजू श्रीवास्तव यांच्यावर २२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एम्स फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांचे पोस्टमॉर्टम ‘नॉव्हेल तंत्रज्ञाना’ने करण्यात आले.
नॉव्हेल तंत्रज्ञान म्हणजे काय?
- डॉ सुधीर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टमचे नवीन तंत्र ‘व्हर्च्युअल पोस्टमॉर्टम’ म्हणूनही ओळखले जाते जे विच्छेदन रहित आहे.
- हे हाय-टेक डिजिटल एक्स-रे आणि सीटी स्कॅनच्या मदतीने केले जाते.
- एम्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, व्हर्च्युअल पोस्टमॉर्टमसाठी नवीन तंत्रज्ञान हे पारंपरिक पोस्टमॉर्टमच्या तुलनेत कमी वेळ घेणारी प्रक्रिया आहे.
- दक्षिण पूर्व आशियातील एम्स दिल्ली ही एकमेव संस्था आहे जी गेल्या दोन वर्षांपासून व्हर्च्युअल पोस्टमॉर्टम करत आहे.
राजू श्रीवास्तव यांचे व्हर्च्युअल पोस्टमॉर्टम का करण्यात आले?
- डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, राजू श्रीवास्तव यांना सुरुवातीला एम्समध्ये आणण्यात आले तेव्हा ते शुद्धीवर नव्हते आणि ट्रेडमिलवर धावत असताना ते पडण्याचे स्पष्ट कारणही नीट सांगितले गेले नाही.
- त्यावेळी म्हणूनच ते वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण बनले. . अशा प्रकरणांमध्ये, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर पोलीस पोस्टमॉर्टमचा पर्याय निवडतात.
- डॉ गुप्ता म्हणाले, रेडिओलॉजिकल पद्धतीने फ्रॅक्चर आणि रक्ताच्या गुठळ्या शोधल्या जाऊ शकतात जे उघड्या डोळ्यांना अदृश्य आहेत.
- अनेकदा लपविलेल्या फ्रॅक्चर आणि जखमा असतात ज्या शोधणे कठीण असते, तसेच व्हर्च्युअल पोस्टमॉर्टम किंवा नवीन तंत्र रक्तस्रावासह हाडांमधील हेअरलाइन किंवा चिप फ्रॅक्चरसारखे लहान फ्रॅक्चर शोधण्यात मदत करू शकतात. जे मृत्यूपूर्व जखमांचे सूचक आहेत.
संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या व्हेंटिलेटरचा पाइप बदलला. त्याचवेळी संसर्गामुळे त्यांची पत्नी शिखा आणि मुलगी अंतरा यांनाही वारंवार ताप येत असल्याने कॉमेडियनला भेटू दिले नाही.