मुक्तपीठ टीम
जर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल तर सप्टेंबर महिना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात एअर एशिया ग्राहकांना जगभर मोफत प्रवास करण्याची संधी देत आहे. जर तुम्हाला एकही पैसा खर्च न करता जगभर भ्रमंती करायची असेल तर तुम्ही एअर एशियाने दिलेल्या या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
एअर एशिया लोकांना मोफत प्रवास करण्याची संधी देऊन आपला पुनरागमनाचा आनंद साजरा करत आहे. या निमित्ताने कंपनी ५० लाख तिकिटे मोफत देत आहे. एअर एशियाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ही विक्री सोमवार १९ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे आणि ती मर्यादित काळासाठी असेल. या ऑफर अंतर्गत एअर एशिया ५० लाख मोफत विमान तिकीटांचे वितरण करणार आहे.
एअर एशियाच्या या ऑफरचा कोण लाभ घेऊ शकणार?
१. एअर एशियाकडून देण्यात येत असलेल्या या ऑफरचा फायदा कोणीही घेऊ शकतो.
- कंपनीने यासाठी कोणतेही नियम लावलेले नाहीत. . परतीचा आनंद साजरा करण्यासाठी एअर एशियाने ही ऑफर दिली आहे.
- एअर एशियाने त्यांच्या अधिकृत साइटवर आणि ट्विटर हँडलवर विनामूल्य तिकीट वितरणाची बाब शेअर केली आहे.
- कंपनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ही ऑफर १९ सप्टेंबरपासून दिली जात असून या ऑफरचा लाभ केवळ मर्यादित काळासाठीच घेता येईल.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर ऑफर दिल्या जाणार
- एअर एशियाकडून या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. केवळ देशांतर्गत फ्लाइटवरच नाही तर आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर देखील या ऑफरअंतर्गत आशियाई देशांमध्ये मोफत प्रवास करता येईल.
- या एअर एशिया ऑफर अंतर्गत, तुम्ही बँकॉक ते क्राबी आणि फुकेत थेट फ्लाइट तसेच बँकॉक ते चियांग माई, साकोन थेट फ्लाइट मिळवू शकता.
- या ऑफर अंतर्गत, तुम्ही नकोर्न, नाकोर्न श्रीथामत, क्राबी, फुकेत, न्हा ट्रांग, लुआंग प्राबांग, मंडाले, नोम पेन्ह, पेनांग आणि इतर अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.
वेबसाइटवरून तिकीट बुक करा
- एअर एशियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हे मोफत तिकीट बुक करू शकता. यासोबतच हे तिकीट अॅपवरही उपलब्ध आहे. एअरएशिया सुपर अॅप किंवा वेबसाइटवरील ‘फ्लाइट्स’ आयकॉनवर क्लिक करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.