मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी नागपपुरातील फुटाळा तलावाजवळील म्युझिकल फाउंटनला भेट दिली. त्यानंतर नागपुरातील एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
राज ठाकरे यांचं तोंड भरून कौतुक!!
- कुंचल्यापासून ते साहित्यापर्यंत, कार्टुनपासून ते संगीतापर्यंत सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ असे ते(राज ठाकरे) कलाकार आहेत.
- विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे, की ज्यांच्या नावाने आपण या कारंजांचे नाव स्वर्गीय लता मंगेशकर असं करणार आहोत.
- त्या स्वर्गीय लता मंगेशकर यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध होते.
- त्यांचं राज ठाकरेंवर पुत्रवत प्रेम होतं.
- म्हणून आज जेव्हा ते नागपुरात आले तेव्हा त्यांना मी आमंत्रित केलं आणि मला खूप आनंद आहे की ते इथे आले.
- राज ठाकरे हे कलाकर आहेत, ते इथे आले आणि त्यांनी हे बघितलं.
- कलेच्या क्षेत्रातील त्यांचं स्थान मोठं आहे.
राज ठाकरेंनीही केली नितीन गडकरींची स्तुती!!
- माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपुरमधील माझ्या सर्व बंधु-भगिनींनो.. मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही.
- जे काही पाहीलं आहे ते भारताच्या बाहेरच पाहिलेलं आहे.
- नितीन गडकरी जे काही करतात ते भव्य दिव्यंच असतं.
- काही खाली करतच नाहीत, ते सगळं वरूनच असतं.
- कारंजाही वर जातो उड्डाणपूल देखील वर जातो. सगळं वरूनच करतात. पण ते जे विचार करतात.
- आमचं खरंतर दोघांची मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो.
- नितीन गडकरी जेव्हा एखादी गोष्ट बोलतात, तेव्हा ते बोलत असताना असं वाटतं की हे सगळं कसं होणार.
- पण ते झाल्यावर कळतं की हे होऊ शकतं.