मुक्तपीठ टीम
भारतीय बनावटीच्या संरक्षण तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या धोरणामुळे आता तेजस लढाऊ विमानांना स्वदेशी रडार मिळणार आहेत. १२३पैकी भारतीय वायुसेनेत सामील होणाऱ्या ५१ टक्के एलसीए स्वदेशी तेजस लढाऊ विमानांना स्वदेशी बनावटीचे उत्तम रडार बसवले जातील. पहल्या काही विमानांमध्ये इस्त्रायली रडार असले तरी पुढे भारतीय रडार असतील.
आपल्या देशाकडे आता रडारचं स्वदेशी तंत्रज्ञान आहे. डीआरडीओने विकसित केलेले उत्तम रडार सीमेवरील चाचण्यांमध्येही चांगली कामगिरी बजावणारे ठरले आहे. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये उत्तमने योग्य क्षमता दाखवली आहे. त्याच्या निर्मितीसाठी हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएलशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सुरुवातीच्या तेजसमध्ये इस्त्रायली कंपनी ईएलटीएचे रडार असतील. त्यानंतर आपली मेड इन इंडिया उत्तम रडार त्यांची जागा घेईल.
तेजसमधील स्वदेशी भाग ६२ ते ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. त्यानुसार ते साध्य होण्यासही, यामुळे मदत होऊ शकेल.
उत्तम ही अत्याधुनिक एईएसए रडार आहे जी एकाधिक लक्ष्य शोधू शकते.
पाहा व्हिडीओ: