मुक्तपीठ टीम
लोकसभा निवडणुकीच्या तयारीस आतापासूनच सुरुवात झाली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून विरोधकांमधील कोणते उमेदवार आवडतात, ते जाणून घेण्यासाठी सी व्होटरने एबीपी न्यूज माझासाठी सर्वेक्षण केले. यात सर्वाधिक टीका होणारे राहुल गांधी हे ज्यांच्या नावावर सहमती होईल, असे सर्वात लोकप्रिय पर्याय ठरले तर त्यांच्यानंतर आणखीही काही चर्चेतील नावे समोर आली.
विरोधकांच्या वतीने पंतप्रधानपदासाठी कोणाला पसंती?
- सी व्होटरच्या सर्वेक्षणात २०२४मध्ये विरोधकांच्या वतीने पंतप्रधानपदासाठी कोणत्या नावावर सहमती होऊ शकते, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सर्वेक्षणादरम्यान सर्वाधिक मते मिळाली आहेत.
- आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
- तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या सर्वेक्षणात तिसऱ्या क्रमांकावर होते.
- या सर्वेक्षणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चौथ्या क्रमांकावर आहेत.
- ममता यांच्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे नाव आले आहे.
- सी व्होटर सर्वेक्षणात १० टक्के लोकांनी इतर उमेदवार या पर्यायाची निवड केली आणि २९ टक्के लोकांनी कोणत्याही नावावर सहमती दर्शवली नाही.
जाणून घ्या कोणाला किती मते मिळाली…
- राहुल गांधी – २३%
- अरविंद केजरीवाल – १८%
- नितीश कुमार – १२%
- ममता बॅनर्जी – ६%
- केसीआर-२%
- इतर-१०%
- नाव नाही – २९%
सर्वेक्षणातील या निष्कर्षांमुळे दुसऱ्या क्रमांकावरील अरविंद केजरीवाल आता जास्तीत जास्त जोर लावत ५ टक्क्यांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतील, हे नक्की आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील नितीश कुमार प्रशांत किशोरांसारख्या रणनीतीकाराकडे लक्ष देण्याची शक्यता आहे.