मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार-खासदारांच्या बंडांनंतर शिवसेना धोक्यात आल्याची चर्चा होती. मात्र, आता शिवसेनेत वेगळ्या विचारधारा आणि पक्षांमधून इनकमिंग वाढलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. औरंगाबादमधील काँग्रेस नेते सचिन तायडे यांनी हात सोडत शिवबंधन बांधलं आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील धांडे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेची मराठवाड्यात ताकद वाढली!!
- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन तायडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधले.
- दुसरीकडे, बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील धांडे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
- मातोश्रीवर मराठवाड्यातील दोन बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यात ताकद वाढली असून याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश!!
- मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कोस्टल गार्ड मासेमारी संघटना तसेच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे काही पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शैलेश घुमारे यांचाही पक्षप्रवेश संपन्न झाला.
- विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश पार पडले.