Sunday, March 15, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंधेरीच्या राजाची संकष्टी चतुर्थीला निघाली भव्य मिरवणूक आणि आज वेसावे समुद्रात विसर्जन

September 14, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Andhericha raja Visarjan

रोहिणी ठोंबरे

अंधेरीच्या राजाची अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी विसर्जन मिरवणूक जल्लोषात पार पडली. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या अंधेरीच्या राजाचे १९७४ पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने आणि कोरोनानंतर दोन वर्षांनी निघणारी येथील मिरवणूक जल्लोषात निघाली असून हजारो गणेश भक्त यात सामील झाले.

कोरोना काळात अनेक निर्बंध होते त्यामुळे गणेशोत्सव दणक्यात साजरा करता आले नाही परंतु, यावर्षी ही सर या उत्साहातून भरून काढलेली आहे. आझादनगर मेट्रो रेल्वे स्थानकपासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला अनेक सेलिब्रेटिंसह गणेश भक्तांनी यंदा मोठी गर्दी केली होती. यावेळी लांबच लांब रांगा आझादनगर परिसरात पसरल्या होत्या. मंगळवारी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आरती झाल्यावर सजवलेल्या ट्रकवर अंधेरीच्या राजाची मूर्ती ठेवण्यात आली. आझाद नगर,अंबोली,अंधेरी मार्केट,एस.व्ही.रोड,जयप्रकाश रोड वरून राजकूमार,अपनाबाजार, चार बंगला, पिकनिक कॉटेज, मछलीमार, गंगाभवन मार्गे वेसावे समुद्रकिनारी दुसऱ्या दिवशी ही भव्य मिरवणूक पोहोचली.

बुधवारी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी दुपारी ०२ च्या सुमारास १८ तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे येथील खोल समुद्रात विसर्जन करण्यात आले. जोपर्यंत अंधेरीच्या राजाचे विसर्जन होत नाही, तोपर्यंत अंधेरीचा गणेशोत्सव संपत नाही. तसेच अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावरच अंधेरीकर संकष्टीचा उपवास सोडतात अशी अंधेरीकरांची दृढ श्रद्धा आहे.

अंधेरीच्या राजाचे संकष्टीदिवशी विसर्जन का केले जाते? काय आहे या मागील मूळ कारण?
१. १९६६ साली अंधेरीच्या आझाद नगर विभागात या राज्याची स्थापना झाली.
२. यावेळी याठिकाणी राहत असलेल्या आणि गोल्डन टोबॅको, एक्सल, टाटा स्टील आणि अन्य कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचे कारखाने बंद पडले होते. ३. आमचे कारखाने परत लवकर सुरू होवू दे, आम्ही अंधेरीच्या राजाचे संकष्टीला विसर्जन करू असा नवस या नागरिकांनी अंधेरीच्या राजाला केला होता.
४. त्यावेळी बंद असलेले कारखाने सुरू झाली. त्यामुळे १९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते.
५. वर्सोवा गावातील मांडवी गल्ली येथील कोळी जमातीचे कार्यकर्ते वर्सोव्याच्या खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे खास बोटीतून विसर्जन करतात.

 

पाहा:


Tags: Andheri RajaAndheri Raja DarshanAngarak Sankashti ChaturthiAzadnagar Metro Railway StationGanesha Devoteesgood newsGrand ProcessionImmersion Ceremonymuktpeethअंगारक संकष्टी चतुर्थीअंधेरीचा राजाअंधेरीचा राजा दर्शनआझादनगर मेट्रो रेल्वे स्थानकगणेश भक्तघडलं-बिघडलंचांगली बातमीभव्य मिरवणूकमुक्तपीठविसर्जन सोहळा
Previous Post

हवेतील घोषणाबाजी! फडणवीसांनी सत्तारांना झापलं!!

Next Post

स्तनाचा कर्करोगग्रस्तांचं बरं होण्याचं जगण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी टाटा रुग्णालयाचा सोपा आणि कमी खर्चाचा अभ्यास

Next Post
Breast Cancer, Tata Memorial

स्तनाचा कर्करोगग्रस्तांचं बरं होण्याचं जगण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी टाटा रुग्णालयाचा सोपा आणि कमी खर्चाचा अभ्यास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!