मुक्तपीठ टीम
चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन ३५ टक्क्यांनी वाढून ६.४८ लाख कोटी रुपये झाले आहे. त्यात वैयक्तिक आयकराचाही समावेश आहे. हे संकलन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कराच्या एकूण अंदाजपत्रकाच्या ३७.२४ टक्के आहे. तसेच प्रवासी वाहनांची घाऊक विक्री वार्षिक २१ टक्क्यांनी वाढून २,८१,२१० युनिट झाली आहे.
प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, १ एप्रिल ते ८ सप्टेंबर २०२२ पर्यंत परतावा वजा केल्यानंतर प्रत्यक्ष कर संकलन ५.२९ लाख कोटी रुपये होते.जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा ३०.१७ टक्के जास्त आहे.यादरम्यान १.१९ लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ६५.२९ टक्के अधिक आहे. कॉर्पोरेट कर संकलनाचा वाढीचा दर २५.९५ टक्के राहिला आहे. त्याचवेळी, सुरक्षा व्यवहार कर (STT) सह वैयक्तिक आयकर संकलनात ४४.३७ टक्के वाढ झाली आहे.
गाड्याच्या विक्रीत २१ टक्क्यांची वाढ
- सुधारित सेमीकंडक्टर पुरवठा आणि सणासुदीच्या मागणीमुळे ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनांची घाऊक विक्री वार्षिक २१ टक्क्यांनी वाढून २,८१,२१० युनिट झाली.
- सियामच्या म्हणण्यानुसार, या कालावधीत सर्व श्रेणीतील वाहनांची विक्री १८ टक्क्यांनी वाढली आहे.