मुक्तपीठ टीम
आज जगभरात ट्विटर हा सर्वाधिक वापरला जाणारा मायक्रो-ब्लॉगिंग साईट बनला आहे, मात्र असे असताना, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलरचा ट्विटर विकत घेण्याचा करार रद्द केला आहे. यानंतर आता ट्विटरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. कारण, एलॉन मस्क यांनी ट्विटरवर लाच दिल्याचा आरोप केला आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरने व्हिसलब्लोअरला गप्प राहण्यासाठी ७० लाख डॉलर दिल्याचा आरोप केला आहे.
एलॉन मस्कचा ट्विटरवर गंभीर आरोप…
- एलॉन मस्कच्या वकिलांनी सोशल मीडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘पीटर जाटको (व्हिसलब्लोअर) आणि त्याच्या वकिलांना ७० लाख देण्यापूर्वी ट्विटरने मस्क यांची संमती घेतली नाही.
- यामुळे विलीनीकरण कराराचे उल्लंघन झाले.
- मस्कसोबतच्या करारादरम्यान ट्विटरला तसे करण्यास मनाई होती.
ट्विटरने आरोप फेटाळून लावले:
- मिळालेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्या वकीलाने कोर्टाला सांगितले की, ‘ट्विटरने व्हिसलब्लोअर पीटर जाटकोला गप्प राहण्यासाठी ७० लाख डॉलर दिले आहेत.
- मात्र, ट्विटरच्या वकिलाने मस्कच्या वकिलाने केलेला हा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे.
- असेही म्हटले आहे की, ट्विटरने कंपनीचे माजी सुरक्षा अधिकारी जटको यांना काही पैसे दिले आहेत.
गुरुवारी या व्यवहाराशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये व्हिसलब्लोअर पीटर जाटकोने ट्विटर सोडल्यानंतर त्याला रक्कम देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला दिलेली रक्कम नुकसानभरपाईशी संबंधित आहे आणि ती कराराचा भाग होती.