Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राधेचं निस्सीम प्रेम आणि मीरेची उत्कट भक्ती…पनवेलच्या महागणपती चरणी फुलला भक्तीचा मळा!

September 9, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Panvel Mahaganpati

मुक्तपीठ टीम

राधेचं निस्सीम प्रेम आणि मीरेची उत्कट भक्ती यांच्या अदभूत मिश्रणाच्या गायकीची उत्कृष्ट पेशकश ज्येष्ठ गायिका संध्या घाडगे यांनी केली. पनवेलचा महागणपती समोर भजनी सेवा अदा करताना घाडगे यांनी त्यांच्या मधुर आवाजाचा झुला आभाळाला टांगला होता. त्या झुल्यावर श्रीकृष्ण आणि राधा झोके घेत होते, तर मीरा विणेच्या झंकरातून श्रीकृष्णाला आळवित होती, इतके मनोहरी दृश्य त्यांनी आवाजाच्या ताकदीने एक राधा एक मीरातून उभे केले होते.

 Panvel Mahaganpati

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आयोजित पनवेलचा महागणपती तथा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि लाभत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पावित्र्याचे जतन करणारे ठरत आहे.

मराठी, हिंदी गीते आणि सर्वोत्तम बंदिश सादर करताना गायकाचा कस लागतो. परंतु, संध्या घाडगे यांनी अतिशय हळुवारपणे सगळ्या जागा उत्तमरित्या सांभाळत गायकी सिद्ध करताना भजनाची उंची वाढवली.

संत वाणी, अभंग रचना, गवळण त्याशिवाय मराठी लोकप्रिय गीते, हिंदी गीते असे गायनातील सर्व प्रकार त्यांनी उत्तमरित्या हाताळले. भक्तीची दिक्षा देणारी ज्ञानेश्‍वर माऊली, वैकुंठाचा राणा साक्षात विठ्ठल, संत तुकोबा, एकनाथ, नामदेव, जनाई, चोखामेला, निवृत्ती, सोपान, मुक्ताई अशा महाराष्ट्रातील संतांसह शेजारच्या राज्यातील संतांनाही त्यांनी गायकीतून प्रकटण्यास प्रवृत्त केल्याने संध्या घाडगे यांच्या जादुई आवाजाची सावली सांज रंगात, श्याम रंगात न्हावून निघाली होती.

सांज ये गोकुळी म्हणत त्यांनी धुळ उडवत निघालेल्या गाई आणि गोकुळ अक्षरशः इथे उभे केले होते. एक तारी संगे एकरूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हाहलो, अशी एक तार छेडत जीवनाच्या इतर व्यर्थ तारा काही कामाच्या नसल्याचाही त्यांनी संदेश देत भगवंताशी एकरूप होण्याचा कानमंत्र सहजपणे दिला.

जुन्या, नव्या भजनातून त्यांनी पंढरी, आळंदी, देहू, पैठण अशी सारी तीर्थक्षेत्र महागणपती चरणी आपल्या माधुर्यपूर्ण आवाजाने निर्माण केल्याने पनवेलची कीर्ती आभाळभर पसरत चालली आहे. त्यांना तबला वादक, धनंजय खुटले, पखवाज वादक मंगेश साळुंखे, टाळ वादक प्रतिक जेऊर्गी, कोरस गीता जेऊर्गी आणि स्वप्ना ठाकूर यांनी साथ दिली

पाहा:


Tags: good newsmuktpeethpanvelPanvel Mahaganpatipassionate devotionRadha-Miraउत्कट भक्तीचांगली बातमीपनवेलपनवेल महागणपतीमुक्तपीठराधा-मीरा
Previous Post

बुद्धिदात्या गणरायाभोवती १५०० पुस्तकांची आरास, साहित्यप्रेम दरवळवण्याचा प्रयत्न!

Next Post

पीईईपी तंत्रानं रडवून नवजात बाळाचा जीव वाचवणं शक्य! मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटणार!

Next Post
PEEP technique

पीईईपी तंत्रानं रडवून नवजात बाळाचा जीव वाचवणं शक्य! मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!