Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याच्यावेळी फडणवीसांच्या बंगल्यावर ‘तो’ संशयित कसा पोहचला?

September 8, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Union Home Minister Amit Shah

मुक्तपीठ टीम

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईत आले होते. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेत मोठी त्रुटी असल्याचे प्रकरण समोर आले आहे. याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या सुरक्षेतही अशाच त्रुटी असल्याचं उघड झाल्यानंतर तीन कमांडोंवर कारवाई झाली होती. अमित शाह यांच्या बंद दरवाजामागील बैठकीतील आक्रमक भाषणाची ऑडिओ क्लिप लिक झाल्यामुळे गाजलेल्या दौऱ्याच्यावेळीच ही घटना घडली आहे. या घुसखोराकडे गृहमंत्रालयाच्या रिबनसह ओळखपत्र असल्याने खळबळ माजली आहे.

 Union Home Minister Amit Shah

देशाच्या गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी सुरक्षेत त्रुटी

  • मुंबईत एक संशयित माणूस तासनतास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याभोवती फिरत होता.
  • या व्यक्तीचे नाव हेमंत पवार असे आहे.
  • तो मूळचा धुळे जिल्ह्यातील तालुका शिंदेखेडा मु पो दाऊळचा राहणारा आहे.
  • तो नेहमी राजकारण्यांभोवती वावरताना दिसतो.
  • मुंबईतील मलबार हिल येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान तो संशयास्पदरीत्या फिरत होता.
  • त्या व्यक्तीने स्वत:ला आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचे सांगितले होते.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी हेमंतवर मलबार हिल पोलिस ठाण्यात कलम १७०, १७१ भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली. त्याच्याकडे गृह मंत्रालयाचे ओळखपत्र होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाबाहेरही ते दिसले. आरोपी हेमंत पवार याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गृहमंत्रालयाच्या रिबनसह ओळखपत्र आलं कुठून?

  • हेमंत पवार गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा वर्तुळाच्या जवळ फिरत होता.
  • केंद्रीय गृह खात्याचा सुरक्षा अधिकारी असल्याचे त्याने भासवले.
  • गळयामध्ये गृह मंत्रालय/ मिनिस्ट्री ऑफ होमअफेअर्स असे लिहिलेल्या निळया रंगाच्या रिबीनसह ओळखपत्र होते.
  • त्यामुळे त्याने शासकीय अधिकारी असल्याची बतावणी केल्याचा आरोप आहे.
  • त्याला हा बॅंड परिधान करण्याचा अधिकार नाही.

एनएसए अजित डोवाल यांच्या सुरक्षेतही त्रुटी

  • या वर्षी फेब्रुवारीमध्ये एनएसए अजित डोवाल यांच्या निवासस्थानीही सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आढळून आल्या होत्या.
  • १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास बेंगळुरूच्या एका व्यक्तीने मध्य दिल्लीतील डोवाल यांच्या उच्च-सुरक्षा व्यवस्थेतील त्यांच्या कारमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
  • सीआयएसएफने याप्रकरणी कडक कारवाई केली आहे. या घटनेनंतर सीआयएसएफचे तीन कमांडो गेल्या महिन्यात बडतर्फ करण्यात आले आहेत.
  • एका डीआयजी आणि एका कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.

Tags: Chief Minister Eknath ShindeDeputy Chief Minister Devendra FadnavismuktpeethMumbai TourUnion Home Minister Amit Shahउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय गृहमंत्री अमित शहाघडलं-बिघडलंमुक्तपीठमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबई दौरा
Previous Post

कुलगुरु डॉ. पेडणेकर यांच्या काव्यसंग्रहाचे राज्यपालांकडून प्रकाशन

Next Post

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा उद्देश काय?

Next Post
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा उद्देश काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!