Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासकामांचा मंत्री संजय राठोड यांच्याकडून आढावा

September 8, 2022
in सरकारी बातम्या
0
तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासकामांचा मंत्री संजय राठोड यांच्याकडून आढावा 1

मुक्तपीठ टीम

सतगुरु श्री सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र, पोहरादेवी, ता. मानोरा जि. वाशिम या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांना गती देण्यात यावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी  दिले. मंत्रालयात  झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.           

या बैठकीला वाशिमचे जिल्हाधिकारी एस शन्मुगराजन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, वन विभाग, महावितरण, ऊर्जा विभाग, वित्त विभाग यासह इतर संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.           

संग्रहालय बांधकामाचा आढावा व अतिरिक्त मागणी, बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा, प्रकल्पासाठी सौर उर्जेचा वापर करणे, अंतर्गत विद्युतीकरण, अंतर्गत गॅलरी डिझाईन निविदा, केसुला वन उद्यान, वाई-गोळ-पोहरा-उमरी राष्ट्रीय महामार्ग, बोटॅनिकल गार्डन यासह इतर महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली.           

बंजारा समाजाच्या पारंपरिक, सांस्कृतिक आणि जनजीवनाचे एकत्रित संग्रह असणारे भव्य संग्रहालय येथे उभे राहणार आहे. बंजारा समाजाची उत्पत्ती कशी झाली, प्राचीन तांडा, जलवाहतूक, बैलगाडी वाहतूक, लग्न विधी व इतर सामाजिक समारंभ अशी विविध माहिती देणारे सचित्र देखावे, प्रकाशयोजना आणि दृक श्राव्य माध्यमातून प्रदर्शित केले जाणार आहेत. पंजाबमधील ‘विरासत-ए-खालसा’ या धर्तीवर तयार होत असलेले हे संग्रहालय जगभरातील पर्यटक व अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या कामास गती देऊन जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मंत्री ,संजय राठोड यांनी यावेळी दिले.


Tags: MaharashtraMinister Sanjay RathodPohradeviपोहरादेवीमंत्री संजय राठोडमहाराष्ट्र
Previous Post

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

कुलगुरु डॉ. पेडणेकर यांच्या काव्यसंग्रहाचे राज्यपालांकडून प्रकाशन

Next Post
Maharashtra Governor releases poetry book by MU VC Suhas Pednekar 3

कुलगुरु डॉ. पेडणेकर यांच्या काव्यसंग्रहाचे राज्यपालांकडून प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!